पाचशे रुपयासाठी मित्रानेच केला मित्राचा खून .मुंबई नाका परिसरातील घटना.
नाशिक जनमत. मुंबई नाका परिसरातील भारत नगर मधे बुधवारी दोघा मित्रांमध्ये वाद होऊन पाचशे रुपयासाठी मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. भारत नगर मध्ये बुधवारी दहा वाजता दोघा मित्रांमध्ये 4000 रुपयासाठी गहाण ठेवलेला मोबाईल परत करण्यावरून वाद झाला त्यानंतर झालेल्या हाणामारीत परवेज शेख या युवकावर त्याच्याच मित्राने धारदार शास्त्राने हल्ला केला.
रक्ताने माखलेल्या आपल्या मित्राला पाहतात त्याने पाळण्याचा प्रयत्न केला यावेळेस परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले याच वेळेस पोलिसांनी यास ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरा मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारत नगर येथे राहणारा परवेज शेख व आकिब सय्यद हे दोघे एकमेकांचे मित्र असून जवळच राहतात परवेजने चार हजार रुपयांच्या गरजेपोटी इब्राहिम कडे मोबाईल गहान ठेवला होता. या घटनेची माहिती परवेजर्च्या पत्नीला समजली. आस्था तिने रात्री पैसे देऊन मोबाईल परत आणण्याचे सांगितले. त्यानुसार परवेज पैसे घेऊन इब्राहिम कडे गेला असता दोघांमध्ये पाचशे रुपये साठी वाद झाला. व या वादातच इब्राहमणे प्ररवेजच्या पोटात धारदार शासनाने वार केले यात परवेज चा मृत्यू झाल्याचे पोलिसातर्फे सांगण्यात आले.