सापडलेल्या बालकांच्या पालकांना* *ओळख पटविण्याचे आवाहन*
*सापडलेल्या बालकांच्या पालकांना*
*ओळख पटविण्याचे आवाहन*
*नाशिक, दिनांक 22 मे, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा):* महिला व बाल कल्याण समिती नाशिक मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
कार्यालया अंतर्गत बालगृहामध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके दाखल केली जातात. सदर बालकांची ओळख पटवून संपर्क साधाण्याचे आवाहन सदस्य सचिव जिल्हा बाल संरक्षण कक्ष तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनिल दुसाणे यांनी केले आहे.
*असा आहे बालकांचा तपशिल*
1.कुमारी दिया, वय 4 वर्षे हा बालिका 29 एप्रिल 2024 रोजी लासलगाव तालुका पोलीसस स्टेशन, ता.निफाड जि. नाशिक यांच्या हद्दीतील लालसगाव स्टेशनलगत चांदवड रोडला पानटपरीच्या बाजुला सदर बालिका विनापालक आढळल्याने या बालिकेस जिल्हा शासकीय रूग्णालय, नाशिक येथे दाखल केले होते. तिला रूग्णालयातून डिस्चार्ज केल्यानंतर 30 एप्रिल 2024 रोजी बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये बालकेला आधाराश्रम, घारपुरे घाट, नाशिक संस्थेत दाखल केले आहे.
2.कु. ईशा राजेश उ र्फ रोशनी कमलेश वरघडे, वय 15 वर्षे ही बालिका 26 सप्टेंबर 2021 रोजी भद्रकाली पोलीस स्टेशन ता.जि.नाशिक यांच्या हद्दीत विनापालक आढळून आल्याने सदर बालिकेस बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये मुलींचे निरिक्षणगृह/बालगृह उंटवाडी रोड, नाशिक संस्थेत दाखल करण्यात आले आहे.
3.कुमारी अबोली वय 17 वर्षे ही दिव्यांग (मुक बधिर) बालिका 12 ऑगस्ट 2021 रोजी इगतपुरी पोलीस स्टेशन, ता.इगतपुरी जि.नाशिक यांच्या हद्दीतील अनुसाया मतिमंद विद्यालयाच्या बाहेर विनापालक आढळून आली. बालिकेस बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये मुलींचे निरिक्षणगृह/बालगृह उंटवाडी रोड, नाशिक संस्थेत दाखल करण्यात आले आहे.
4. कुमारी ज्योती काशिनाथ वाघ वय 15 वर्षे ही मुक बधिर बालिका 21 सप्टेंबर 2023 रोजी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन ता.जि.नाशिक यांच्या हद्दीत भगूर येथील आठवडे बाजारात विनापालक आढळून आली. बालिकेस बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये मुलींचे निरिक्षणगृह/बालगृह उंटवाडी रोड, नाशिक संस्थेत दाखल करण्यात आले आहे.
या चारही बालकांच्या भविष्याचा विचार करता कु.दिया हिच्या पालकांनी आधाराश्रम संस्था, घारपुरे घाट, नाशिक येथे 0253-2580309, 2950309 या दूरध्वनी क्रमांकावर आणि कु.ईशा, कु.अबोली व कु.ज्योती यांच्या पालकांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष नाशिक, समाज कल्याण आवार, नाशिक पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक 0253- 2236368 या ठिकाणी संपर्क साधावा.
माहिती प्रसारणाच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत बालकांचा दावा करण्यास कोणी आले नाही तर बालकांना पालक नसल्याचे गृहीत धरून पुढील पुनर्वसनाचा विचार करण्यात येणार असल्याचेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनिल दुसाणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे