नॅशनल एंटरप्राईसेस नाशिक येथे शिवजयंती निमित्त आर्थिक साक्षरता व केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कर्ज योजनांवर मार्गदर्शन . व शिबिर आयोजित .
दिनांक १९.०२.२०२३ रोजी नॅशनल एंटरप्राईसेस नाशिक येथे शिवजयंती निमित्त आर्थिक साक्षरता व केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कर्ज योजनांवर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिवजयंती निमित्त एक स्तुत्य उपक्रम म्हणून बेरोजगार, सुशिक्षित वर्ग,महिला वर्ग, शेतकरी, कामगार, व्यापारी वर्ग, फेरीवाले, छोटे व्यावसाईक यांनी केंद्र व राज्य सरकार तसेच विविध महामंडळच्या कर्ज योजनांच्या माध्यमातून नवीन व्यवसाय सुरू करणे व सुरू असलेले व्यवसाय वृद्धिंगत करणे, शेतकरी व शेतकरी पुत्रांनी शेती व शेतीसोबत जोड व्यवसाय सुरू करणेसाठी असलेल्या कर्ज योजना, या सर्व योजनांच्या माध्यमातून मिळणारे अनुदानाबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन मा.श्री.महेंद्र रोकडे, (से. नि. प्रबंधक, एसबीआय) यांनी दिले. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते श्री. पुरुषोत्तम वाणी, सौ शोभाताई काळे, श्री. बाळासाहेब सांगळे, श्री. महेंद्र हिरे, श्री.मोहन जगताप, श्री.रवी गायकवाड,श्री शरद शिंदे, श्री राजू कुमावत,श्री.श्याम गोसावी, श्री.समाधान बागल, श्री.चकोर, श्री. हारून शेख आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून मा.डॉ. अशोक थोरात (जिल्हा शल्यचिकित्सक,नाशिक), मा.डॉ. अरुण पवार (ACS,नाशिक), मा.डॉ. अनंत पवार, (वैद्यकीय अधिकारी,नाशिक), मा.डॉ. रोहन बोरसे, (वैद्यकीय
अधिकारी,नाशिक), मा.डॉ.पाटील, (वैद्यकीय अधिकारी,नाशिक), मा. पुंजाबई बोडके, मा. श्री. दत्तूभाउ बोडके (उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख,प्रहार) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेछ्या दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.महेश बैरागी सर यांनी केले.
आभार प्रदर्शन नॅशनल एंटरप्राईसेसचे संचालक श्री. विजय कापडणीस यांनी केले.