बच्चू कडू याचे जिल्हाधिकारी नाशिक यांना आदेश .धान्य वितरण कार्यालयात भ्रष्टाचाराचा कळस. आता होणार जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरून धान्य वितरण कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांची विभागीय चौकशी …करण्याची मागणी.
-श्री, बच्चू कडू मंत्री व दिव्यांग कल्याण मंत्रालयातर्फे जिल्हाधिकारी नाशिक यांना आदेश .धान्य वितरण कार्यालयात भ्रष्टाचाराचा कळस आता होणार जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरती धान्य वितरण कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांची विभागीय चौकशी …करण्याची मागणी*
नाशिक जनमत नाशिक येथील दिव्यांग व्यक्तींच्या निवेदन तक्रार अर्जाची पुराव्यासह श्री बच्चू कडू साहेब मंत्री दर्जा दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या स्तरावरती गंभीरतेने दखल घेऊन अन्न व धान्य वितरण कार्यालय नाशिकरोड नाशिक अंतर्गत कार्यरत कर्मचारी श्री राहुल डोळसे श्री . नितिन गायकवाड व श्रीमती वैशाली शिंदे मॅडम यांचेकडून गरिब दिव्यांग व्यक्तींना शासनाकडून मिळणा – या रेशनपासून वंचित ठेवणाऱ्या. तसेच संबधीत कार्यालयामध्ये बाहेरील खाजगी दलाल ठेवून दिव्यांग बांधवाची नविन रेशन कार्ड , अंत्योदय योजनेच लाभ मिळणेकरीता शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत फोन पे च्या खाजगी मोबाईल नंबर वरती उघडपणे गोरगरीब जनतेकडून व वंचित गरीब दिव्यांग बांधवांची आर्थिक लुट करणाऱ्या धान्य वितरण कार्यालयामधील दोषी कर्मचा – यासमवेत तत्कालीन तहसिलदार श्री .नितीन गर्जे साहेब व तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. रमेश मिसाळ साहेब यांचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे . तसेच याबाबत सामान्य गोरगरीब त्रस्त जनतेकडून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वारंवार दिव्यांग बांधवांमार्फत तक्रारी दिल्या असता अद्यापही तत्कालीन जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून कारवाई इ झालेली नसून दिव्यांगाच्या शोषणामध्ये जबाबदार सर्वच दोशी अधिकारी कर्मचारी व त्यांना पाठीशी घालणारे वरिष्ठ अधिकारी यांचा देखील समावेश दिसून येत आहे. तरी सदर प्रकरणी तातडीने विद्यमान जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावरती स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करून कार्यवाही करून दोषी अधिकारी कर्मचा – यांची विभागीय चौकशी लावण्या अगोदर भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून या सर्व दोषी अधिकारी कर्मचारी यांची इतरत्र बदली करून व सेवा हमी कायदा व दप्तरदिरंगाई कार्यद्यांतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात यावी तसेच सर्व दोषी अधिकारी कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्या काळ्या पैशाची सखोल चौकशी ACB विभागाकडून करून लाखोंची माया आज पर्यंत जमविणाऱ्या भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांची संपत्ती जप्त करून विभागीय चौकशी करून शासन सेवेतून या भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे व दिव्यांग व्यक्तींना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आशा स्वरूपाचे निवेदन अर्जाद्वारे तसेच दिव्यांग कल्याण मंत्रालय यांच्या पत्राच्या आदेशावरून जिल्हा पुरवठा उपायुक्त श्रीमती प्रज्ञा बडे मिसळ मॅडम यांना प्रत्यक्ष भेटून करण्यात आली सदरील माहिती ही श्री अनिल साळवे सर , श्री, दीपक सरोदे , व त्यांचे सहकारी दिव्यांग बांधव श्री सागर पवार , श्रीमती शुभांगी येवले श्री अभिजीत माळोदे श्री विशाल खैरनार श्री, सुनील मोकळे तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री गौतम सोनवणे श्री पवन पगारे तसेच श्री मंगेश आढाव यांनी माहिती पत्रकारांना दिली