लाईट व पाणी नसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये अंबड परिसरामध्ये हाल. इंजिनीयरची बदली करण्याची नागरिकांची मागणी.
⊥नाशिक जनमत प्रतिनिधी गेल्या दोन महिन्यापासून अंबड डीजेपी नगर दोन कामटवाडा केवल पार्क परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव चालू आहे त्यातच शनिवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद होता रविवारी सकाळी पहाटेपासूनच नागरिकांच्या टाक्यांमध्ये व सोसायटीच्या टाक्यांमध्ये पाणीपुरवठा झाला परंतु रात्रीपासून लाईट नसल्याने व कर्मचारी इंजिनियर फोन उचलत नसल्याने नागरिकांना रात्र ही अंधारात काढावे लागले तर दिवसा लाईट नसल्याने पाण्या पासून वंचित राहावे लागले अनेक नागरिकांनी सकाळी दहा वाजले तरी लाईट व पाणी न आल्याने आंघोळी सुद्धा केल्या नाही. नागरिकांचा रोजचा नित्य नियम खंडित झाला महिला वर्गांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे घरातील पिण्याचे पाणी व वापराचे पाणी संपल्याने पाण्यासाठी
फिरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे जोरदार पाऊस नसताना नेहमी या भागामध्ये रात्री कधीही लाईट जाते वीस ग्राहकांन मोठ्या प्रमाणात लाईट बिल दर महिन्याला येत असते नागरिक हे लाईट बिल देखील भरतात परंतु वीज कंपनी तर्फे नागरिकांचे हाल होत असून परिसरामध्ये लाईट बरोबर आता पाण्याचे देखील हाल होऊ लागले आहे. कामटवाडा येथील इंजिनियर तसेच परिसरातील वायरमन यांचे फोन बंद येतात कधी रिंग गेली तर हे कर्मचारी फोनच उचलत नाही त्यामुळे
नागरिकांना समजत नाही की कधी लाईट येणार दरम्यान या कर्मचारी व अधिकाऱ्यांची या भागातून बदली करण्यात यावी. वीस लाख लोकसंख्येच्या नाशिक मध्ये बारा वर्षातून कुंभमेळा भरणाऱ्या या स्मार्ट शहरांमध्ये सध्या लाईट व पाण्या वाचून नागरिकांचे हाल होत असून नाशिक शहराला हा प्रकार शोभणारा नाही अनेकांच्या घरी पाहुणे येतात तसेच लाईट नसल्यामुळे हॉस्पिटल दवाखाने व्यवसाय कारखानदार यांचे मोठे नुकसान या भागांमध्ये होत आहे या सर्व प्रकारास महावितरण कंपनी व अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई कधी होणार असे नागरिक संतप्त होऊन बोलत आहे. नागरिकांचे हाल कधी थांबणार. ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये सर्व सुख सोयी असताना असे प्रकाराचा नेहमीचे झाले आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी होत आहे.