गरुड झेप प्रतिष्ठान च्या वाहतूक सुरक्षा अभियानाचे 2000 दिवस पूर्ण

गरुड झेप प्रतिष्ठान च्या वाहतूक सुरक्षा अभियानाचे 2000 दिवस पूर्ण
गरुड झेप प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम करत नासिक मध्ये एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. गडकोट संवर्धन , गोदावरी स्वच्छता अभियान , बेटी बचाव बेटी पढाव अभियान व वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा अभियान गेली 2000 दिवस सातत्यपूर्ण राबवत नवीन जागतिक विक्रम केला आहे.
25 मार्च 2018 पासून सातत्यपूर्ण हे अभियान सुरू आहे .याचे 13 जागतिक विक्रम झाले आहेत .ब्राहो इंटरनॅशनल , वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स ,लंडन यामध्ये नोंद झाली आहे .
आज नाशिक मध्ये हेल्मेट चा वापर अनेक पटीने वाढला आहे . समाज वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहे .नाशिक अपघात शून्य करायचे असेल तर मोठ्या प्रमाणात जनजागर आवश्यक आहे. गेली 2000 दिवस गरुड झेप चे कार्यकर्ते – डॉ संदीप भानोसे ,संकेत भानोसे ,संगीता भानोसे ,रेणू भानोसे , सागर बोडके ,अंजना प्रधान , अजिंक्य तरटे ,रवींद्र जोशी, मनोहर जोशी ,रवींद्र कुलकर्णी ,सौ कुलकर्णी ,अमोल अहिरे ,राम अहिरे , तन्मय सूर्यवंशी, यश साबळे , मनीष बाविस्कर
हिरवांकुर फाउंडेशन –
निलय बाबू शहा ,नलिनी शहा , रूपाली शहा ,पार्वती पटेल ,रफिक भाई होरा ,दिलीप खैरनार
वेदास – सौरभ सोनवणे ,साईईश्वरी सोनवणे
रॉयल रायडर्स – राजु रुपवते
निर्भय महाराष्ट्र – सोमा कुराडे , जितेंद्र भावे , जगबीर सिंग
आपले रुग्णालय – रोहित पारख श्वास संस्था – अविनाश तरटे ,अरुण कुलकर्णी , डॉ दिलीप कुकर
श्री नासिक पंचवटी पांजरपोळ कार्यकर्ते – भास्कर थाळकर ,दामू धनगड ,गोरख महाजन , विजय चव्हाण
पुण्याची सामाजिक संस्था मनोज बिबवे, देविदास गिरमे सचिन पाटील इत्यादी
व इतर कार्यकर्ते अभियान यशस्वीरित्या राबवत आहेत . सातत्यपूर्ण 2000 दिवस एखाद्या अभियान राबवणे यासाठी चिकाटी , सकारात्मक विचार, संयम ध्येयनिश्चिती कार्य प्रेरणा व राष्ट्रभक्ती तसेच समाजाप्रती अतिउप्रेम आवश्यक आहेत. जागतिक विक्रम नोंदवणारी ब्रावो इंटरनॅशनल चे अराफत जळगावकर यांनीही अभिनंदन पर पत्र पाठविले व लवकरच जागतिक विक्रम प्रमाणपत्र पाठविले जाईल याची ग्वाही दिली.
पुढील टार्गेट सातत्यपूर्ण तीन हजार दिवस असे गरुड झेप चे अध्यक्ष संदीप भानोसे यांनी जाहीर केले.