मनोबल वाढविण्यासाठी राजयोगाची आवश्यकता :- राजयोगिनी ब्रम्हाकुमारी वासंती दीदी प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनाचा कार्यक्रम
मनोबल वाढविण्यासाठी राजयोगाची आवश्यकता :-
राजयोगिनी ब्रम्हाकुमारी वासंती दीदी
प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनाचा कार्यक्रम
नाशिकः प्रतिनिधी
आजकाल दैनंदिन जीवनामध्ये ताण-तणाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याचा परिणाम कळत-नकळत आरोग्यावर होत आहे.मन आणि तन यांचा अतिशय जवळचा संबंध असून मनुष्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य एकमेकांशी निगडीत आहे. शारीरिक आरोग्य ढासळते,तेव्हा माणूस मनाने खचतो आणि मानसिक व्याधीचा बळी ठरतो.म्हणून मनोबल मजबूतसाठी ब्रह्माकुमारीच्या राजयोगाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या नाशिक सेवा केंद्राच्या जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांनी व्यक्त केले.
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे म्हसरूळ येथील मुख्य सेवा केंद्रात मानसिक विकारांच्या विषयांबाबत जनजागृतीच्या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात ब्रम्हाकुमारी वासंती दीदी अध्यक्षतेखाली बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मानसोपचार तज्ञ डॉ.अनुप भारती,अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रीतम पवार, डॉ. योगेश निकम,ब्रह्माकुमारी पुनम दीदी आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ब्रह्माकुमारी वासंतीस दीदी म्हणाल्या की,कोविड-19 महामारीचे दुष्परिणाम सर्वांनीच अनुभवले असून लोकांमध्ये अनेक प्रकारच्या मानसिक आरोग्यविषयक विकारांना जन्म दिला असून तो दूर करण्यासाठी ताण-तणाव रहित जीवन आनंदी जगण्यासाठी ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयात विनामूल्य प्रवेश घेऊन सात दिवसाचा कोर्स करून घ्यावा असे सांगितले. यावेळी डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचे मानसोपचार तज्ञ डॉ.अनुप भारती यांनी मनोगतात आपल्या शरीराप्रमाणे आपले मन देखील आजारी पडू शकते. त्यामुळेच आपल्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
सुदृढ मानसिक आरोग्यासाठी आपले विचार भावना व वर्तणूक ही योग्य व समतोल असणे आवश्यक आहे.
आपल्या भावना आपल्या कुटुंबातील व्यक्तींना, मित्र परिवाराला मन मोकळ्या पद्धतीने व्यक्त केल्यास ताण तणाव हलका होण्यास मदत होईल. योग्य आहार, व्यायाम, मेडीटेशन आपल्या जीवनशैलीचा भाग होणे आवश्यक आहे. मात्र स्ट्रेस सहन होत नसल्यास अथवा त्याचे मानसिक आजारात रूपांतर झाल्यास त्वरित आपल्या जवळच्या मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे उपयुक्त आहे, कारण लवकर निदान व उपचार सुरू केल्यास मानसिक आजार बरे होऊ शकतात,असे सांगितले.
निम्स हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रीतम पवार यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे महत्त्व विशद विशद करत आपले वैयक्तिक,कौटुंबिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी राजयोग मेडिटेशन फायदेशीर असल्याचे सांगत आपला अनुभव कथन केला.यावेळी वरदान हेल्थ फाउंडेशनचे संस्थापक डॉ.योगेश निकम यांनी आपण बारा वर्षापासून करत असलेल्या राजयोग अभ्यासाचे महत्त्व व फायदे तसेच कुटुंबातील बदल व मानसिक स्वास्थ्याविषयी माहिती देत आपल्या जीवनावर राजयोग मेडिटेशनचे कसे सकारात्मक बदल झाले हे सांगितले.यावेळी पाहुण्यांचा दीदींच्या शुभहस्ते स्लोगन फ्रेम,शाल,पुष्पगुच्छ,सौगात देत स्वागत व सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजयोगिनी ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी सुंदररित्या केले. यावेळी कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य अपंग कर्म/अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणेसर,त्रंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे विश्वस्त प्रा.अमर ठोंबरे,साहेबराव पगारे,मोहनभाई राजपूत,बीके. विपुलभाई,बीके कस्तूभभाई,मनोज यादव,मंगेश सौंदाणे,निखिल निकम,गिरीश शिंपी,ब्रह्माकुमारी रवीनादीदी, सुनिता जाधव,भदाणे माता,निर्मला आदींसह मोठ्या संख्येने साधक बंधू-भगिनी उपस्थित होते.