ब्रेकिंग

नाशिक मध्ये रस्त्यांची दूरदशा. स्मार्ट सिटी ची लागली वाट .

नाशिक मध्ये रस्त्यांची दूरदशा. स्मार्ट सिटी ची लागली वाट

.नाशिक जन्मत. गेल्या चार-पाच दिवसापासून नाशिक शहरामध्ये मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे परंतु ही संतदार कायम आहे दरम्यान नाशिक महानगरपालिकेतर्फे पावसाळ्याच्या अगोदर करण्यात आलेली जी रस्त्याची कामे आहेत. ती अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे सर्वत्र दिसत आहे मखमालाबाद रोड. खुटवड नगर रस्ता तसेच सातपूर परिसरातील अंबड परिसरातील नाशिक पुणे हायवे हा द्वारका ते नाशिक रोड पर्यंत पूर्णपणे खराब झाला आहे अक्षरशा या रस्त्यावर चालताना गाड्या खड्ड्यात जाऊन पडतात तसेच वाहन चालवताना वाहने खालीवर म्हणजेच डान्स करत चालत आहे दरम्यान पाऊस उघडण्याचे नाव घेत नाही तसेच वाहन चालवताना हे खड्डे पाण्याने भरले असल्याने खड्ड्याचा अंदाज येत नाही व त्यामध्ये नागरीक पडत आहे. महानगरपालिकेने या रस्त्यांकड पाऊस उघडताच लवकरात लवकर लक्ष देऊन ही खड्डे कायमस्वरूपी बुजावी. अशी मागणी वाहनधारक करत आहे. तर शहरातील नव्याने होणाऱ्या वसाहतीमध्ये रस्ते पूर्णपणे खराब झाले असून असून चीखल रावर वाहने घसरून पडत आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी यांचे कपडे भरत आहे तसेच वाहने इतर सोसायट्यांच्या पुढे रात्रभर

 

 

उभी करून पायी जावे लागत आहे. सध्या नाशिक शहरातील वांहन धारक नागरिक संताप व्यक्त करत आहे. सर्व प्रकारचे नागरिक कर भरत असून नाशिककरांना मुंबई पुण्यासारखी रस्त्यांची सुख सोयी मिळत नाही रस्ते खराब असल्याने ट्राफिक जामची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाऊस उघडताच ही कामे लवकरात लवकर करावी अशी मागणी वानधारकांनी केली आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे