आदर्श जीवन जगत समाज विकासासाठी योगदान द्या डॉ. गुट्टे महाराज : “वंजारी समाजरत्न, समाजभूषण पुरस्कारांचे वितरण .
डॉ. गुट्टे महाराज : "वंजारी समाजरत्न, समाजभूषण पुरस्कारांचे वितरण ."

आदर्श जीवन जगत समाज विकासासाठी योगदान द्या
डॉ. गुट्टे महाराज : “वंजारी समाजरत्न, समाजभूषण पुरस्कारांचे वितरण .”
नाशिकः प्रतिनिधी
त्याग अन् समर्पण यामुळे आपण पुरस्कारसाठी पात्र आहेत. पुरस्कार मिळाल्यामुळे समाजासाठी योगदान देण्याची जबाबदारी वाढली आहे. आदर्श जीवन जगत समाजाच्या विकासासाठी आपण कार्य करावे असे आवाहन संत साहित्याचे गाढे अभ्यासक व श्री सिध्दी विनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष डॉ तुळशीराम महाराज गुट्टे यांनी केले.
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक क्रांती सेना व न्यू विकलांग बहु उद्देशिय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती दिनी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता वंजारी समाजरत्न , समाजभूषण पुरस्कार २०२३ चे वितरण करण्यात आले. कॅनडा कॉर्नर येथील व्ही एन नाईक शिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षे तील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.जगन्नाथ धात्रक, क्रा. नाईक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, ज्येष्ठ उद्योजक बुधाजी पानसरे, भाजपचे ज्येष्ठ नेते गिरिश पालवे, वंजारी सेवा संघाचे गुजरात प्रदेश अध्यक्ष मोहन घुगे, वंजारी सेवा संघाचे अध्यक्ष बबन खाडे, गुजरात येथील भोज राज गीते, उद्योगपती मोहन घुगे, यमुनाताई घुगे , अरुणा दरगुडे , बाळासाहेब घुगे, दामोदर मानकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
समिती अध्यक्ष बी. के.नागरे सर, रंगनाथ दरगुडे, बाळासाहेब घुगे, प्रकाश चकोर, मारुती इलग , आदिनाथ नागर गोजे, विलास सानप, रोही दास आव्हाड आदींनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला.यावेळी गिरिश पालवे, पंढरीनाथ थोरे , बुधाजी पानसरे यांनी सत्काराला उत्तर दिले. मुंबई येथील दत्ताराम घुगे यांनी मनोगतात मुंबई , दहिसर येथील स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या होत असलेल्या स्मारक विष्यी माहिती दिली. कार्यक्रमास समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळकृष्ण नागरे प्रास्ताविक संस्थेची माहिती दिली. बाळासाहेब घुगे यांनी आभार मानले.
चौकट
प्रतिभा नवाळे यांची यशोगाथा थोडक्यात
सात महिन्याचे बाल व दुसरी मुलगी अडीच वर्षाची आईचे वय 21 वर्ष आणि पती सुनील नवाळे यांचे निधन. अशा परिस्थिती त सासू-सासऱ्यांबरोबर दिवसभर शेतात काम करून घरी आल्यावर स्वयंपाक केल्यानंतर सर्व गाव झोपल्यावर रात्री दहा ते एक असा अभ्यास करून प्रतिभा नव्हाळे बारावी पास झाली. शेतात काम करत असताना बाहेरून यशवंतराव मुक्त विद्यापीठाकडून ग्रॅज्युएशन केलं. यानंतर वय कमी असताना देखील मुलींच्या पालन पोषण साठी लग्न न करता आज स्वतःच्या पायावर एसटी क्लार्क झाले आहे. मोठी मुलगी दहावीला 92 टक्के मार्क मिळवत पास झाली आहे तर लहान मुलगी आठवीमध्ये आहे. मृदंग खूप छान वाजवते.रंनगणी होऊन प्रतिभा लढत राहिली. आज तिचा समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी तिच्या डोळ्यात आनंद अश्रू होते.
आत्ताचा फोटो.
समाजाने केलेल्या कार्याची व लढवय्या वृत्तीची दखल घेतल्याबद्दल समर्थ रत्न पुरस्कार दिल्याबद्दल धन्यवाद आयोजकांचे मानले.
पंढरी नाथ थोरे यांचा नागरी सत्कार
शैक्षणीक, सहकार, सामाजिक, राजकिय क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या पंढरी नाथ थोरे यांचा नागरी सत्कार करण्यात येईल. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ उद्योजक बुधाजी पानसरे, गिरिश पालवे, ज्येष्ठ पत्रकार श्याम उगले, धनंजय बोडके न्यायधिश कीर्ती कातकडे, कृषी अधिकारी रणजित आंधळे , आदर्श सरपंच धनंजय कांदे , डॉ राधाकृष्ण सांगळे, विमल आव्हाड, गायत्री घुगे , प्रतिभा नवाळ आदींसह २१ जणांचा समावेश होता.