भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन;* *जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न*

*भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन;*
*जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न*
नाशिक, दिनांक: 15 ऑगस्ट, 2023 नाशिक जनमत. स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी व उपस्थित नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जितिन रहेमान, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, भीमराज दराडे, डॉ. शशिकांत मंगरूळे, रवींद्र भारदे, सीमा अहिरे, शुभांगी भारदे, जिल्हा
पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, तहसीलदार परमेश्वर कासुळे, अमोल निकम, रचना पवार, मंजुषा घाटगे, वैशाली आव्हाड, विधी अधिकारी हेमंत
नागरे, नायब तहसिलदार विजय कच्छवे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक तसेच नागरिक उपस्थित होते.