पालखेड डाव्या कालव्यातून सोडलेल्या पाण्याचा* *काटकसरीने वापर करावा* *: कार्यकारी अभियंता वैभव भागवत*
*पालखेड डाव्या कालव्यातून सोडलेल्या पाण्याचा*
*काटकसरीने वापर करावा*
*: कार्यकारी अभियंता वैभव भागवत*
*नाशिक, दिनांक: 14 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्त):*
पालखेड डाव्या कालव्यावरील शासनमान्य पाणी पुरवठा योजनांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 6 ऑगस्ट पासून सुरू केलेले बिगर सिंचन आवर्तन 13 ऑगस्ट 2023 रोजी बंद करण्यात आले आहे. धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने पालखेड समूहातील धरणे अद्याप 100 टक्के भरली नसल्यामुळे पुरवठा झालेल्या पाण्याचा पाणीवापर संस्थांनी काटकसरीने वापर करावा असे आवाहन नाशिक पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी केले आहे.
पालखेड पाटबंधारे विभागाकडून सदर आवर्तनात कालव्याद्वारे शासनमान्य बिगर सिंचन संस्थांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येवून त्यात 1) येवला नगर परिषद पाणीपुरवठा योजना 2) येवला तालुक्यातील 38 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना 3) मनमाड नगर परिषद पाणी पुरवठा योजना 4) मध्य रेल्वे, मनमाड पाणी पुरवठा योजना 5) ग्रामपंचायत आंबेगाव पाणीपुरवठा योजना या शासनामान्य बिगर सिंचन संस्थांना पिण्याच्या पाण्याचा त्यांच्या साठवण तालावात पाणी पुरवठा करण्यात आला आहे. धरणात पाण्याचा येवा कमी असल्यामुळे पालखेड समूहातील धरणांमध्ये आजमितीस सुमारे 54 टक्के इतका पाणी साठा असल्याचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी कळविले आहे.