मविप्र’च्या शाळांमधील पाच विद्यार्थ्यांना परदेशवारीची संधी..!* *अमेरिकन फिल्ड सर्व्हिसेस या संस्थेमार्फत निवड*
*‘मविप्र’च्या शाळांमधील पाच विद्यार्थ्यांना परदेशवारीची संधी..!*
*अमेरिकन फिल्ड सर्व्हिसेस या संस्थेमार्फत निवड*
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विविध शाळांमधील तीन मुली आणि दोन मुले अशा पाच विद्यार्थ्यांची परदेशवारीसाठी निवड झाली आहे. देशभरातून अशा ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, महाराष्ट्रातून केवळ ‘मविप्र’चेच पाच विद्यार्थी आहेत.
अमेरिकन फिल्ड सर्व्हिसेस (एएफएस) या संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या कल्चरल एक्सचेंज प्रोग्राममार्फत दरवर्षी भारतातून काही विद्यार्थी अमेरिकेसह अन्य देशांत पाठवले जातात. हे विद्यार्थी एका वर्षासाठी अमेरिकेत ठराविक एका कुटुंबात एक याप्रमाणे वास्तव्य करतात. यावर्षी भारतातून असे ३० विद्यार्थी अमेरिकेसह विविध देशांत जात आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील केवळ पाचच विद्यार्थी तेही ‘मविप्र’च्याच शाळांमधील आहेत. या पाच विद्यार्थ्यांसह ‘एएफएस’चे समन्वयक जिवन शिंदे, प्रा. शिवाजी शिंदे, सातपूर जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद कांगुणे, गंगापूर रोडवरील न्यू मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे, पवननगर जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक अण्णासाहेब ठाकरे, सिन्नर वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब देशमुख व पालक यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ‘मविप्र’चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल आदी पदाधिकारी व संचालक मंडळाने पुष्पगुच्छ देऊन या सर्वांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. भास्कर ढोके, डॉ. विलास देशमुख, डॉ. नितीन जाधव व पालक उपस्थित होते
संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांमधील अनेक विद्यार्थी नेहमीच विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत असतात. ‘एएफएस’ या संस्थेमार्फत कल्चरल एक्सचेंज प्रोग्रामसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ आमच्या संस्थेतील पाच विद्यार्थ्यांची निवड होणे, ही मविप्र समाजासाठी अभिमानास्पद बाब आहे.
*- ॲड. नितीन ठाकरे,* सरचिटणीस, मविप्र, नाशिक.
*…असे आहेत विद्यार्थी*
न्यू मराठा हायस्कूल, गंगापूर रोड : वैदेही विधाते (यु.एस), सात्विका कदम (फ्रान्स).
जनता विद्यालय, पवननगर : कृष्णा पवार (अमेरिका)
वाजे विद्यालय, सिन्नर : सृष्टी कासार (अमेरिका), सारंग पानसरे (अमेरिक
नाशिक : परदेशवारीसाठी निवड झालेल्या पाच विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. भास्कर ढोके, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे, अण्णासाहेब ठाकरे, ‘एएफएस’चे समन्वयक जिवन शिंदे, प्रा.शिवाजी शिंदे, प्रमोद कांगुणे व पालक.