ओझर मिग होरायझन अकॅडमीत रंगला विद्यार्थी गुणगौरव सोहळा*
*ओझर मिग होरायझन अकॅडमीत रंगला विद्यार्थी गुणगौरव सोहळा*
*नाशिक :* मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ओझर मिग येथील होरायझन अकॅडमीत मुख्याध्यापिका मीरा पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज दिनानिमित्त आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी आणि दहावीच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश कमानकर, सूर्यभान भोज, सर्व सदस्य, पालक शिक्षक संघाचे सदस्य आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य गणेश गायखे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. शिक्षक सचिन आव्हाड व उर्मिला साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांनी समाजगीत गीत सादर केले. शिक्षिका जयश्री कुशारे व विद्यार्थिनी सिया वैष्णव यांनी भाषणातून कर्मवीरांच्या कार्याला उजाळा दिला. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य रावसाहेब चौधरी, पालक शिक्षक संघाच्या सहसचिव कल्पना सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे सूर्यभान भोज यांनी भाषणातून कर्मवीरांविषयी मोलाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
*…यांचा झाला गौरव*
इयत्ता दहावीमधील गुणवंत विद्यार्थी संचित जाधव, ओम उगले, आदित्य चौधरी, ईश्वरी चौधरी, अनुश्री मौर्य या विद्यार्थ्यांचा व समाज दिनानिमित्त तालुकास्तरीय झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत शाळेचा विद्यार्थी ऋग्वेद गुरगुडे याचा तृतीय क्रमांक आल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला
*नाशिक :* मविप्र समाजाच्या ओझर मिग येथील होरायझन अकॅडमीत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी मान्यवर व शिक्षकवृंद.