डिजिटल इंडिया सप्ताहाचे २५ ते ३१ जुलै दरम्यान आयोजन*

*डिजिटल इंडिया सप्ताहाचे २५ ते ३१ जुलै दरम्यान आयोजन*
*: संजय गंजेवार*
*विद्यार्थी, युवक व सर्वसामान्य नागरिकांनी नोंदणी करा
*नाशिक, दिनांक 17 जुलै 2023 (नाशिक जनमत वृत्तसेवा) :*
भारत सरकारच्या वतीने २५ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत डिजिटल इंडिया सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. या कालावधीतील विविध कार्यक्रमास विद्यार्थी, युवक व सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहण्यासाठी जिल्हा सूचना अधिकारी (NIC) संजय गंजेवार यांनी आवाहन केले आहे.
भारताचे तंत्रज्ञान जगासमोर दाखवणे, टेक स्टार्टअप्ससाठी सहयोग आणि व्यवसायाच्या संधी शोधणे तसेच नेक्स्टजेन नागरिकांना प्ररेणा देण्याच्या उद्दीष्टाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. नोंदणी करणेसाठी https://www.nic.in/diw2023-reg/ ही लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नोंदणी केल्यावर एसएमएस/ई-मेलवर कार्यक्रमा विषयी सर्व अपडेट प्राप्त होईल. तसेच वरील लिंकसोबतच खालील क्युआर कोड वरून देखील नोंदणी करता येणार असल्याचेही श्री. गंजेवार यांनी कळविले आहे.