ब्रेकिंग
12 सप्टेंबर रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन
दि. 5 सप्टेंबर, 2022
नाशिक जनमत चंद्रकांत धात्रक संपादक यांच्याकडून
*12 सप्टेंबर रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन*
*नाशिक,दि. 5 सप्टेंबर,2022
12 सप्टेंबर,2022 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक रोड, नाशिक येथे करण्यात आल्याची माहिती, उपायुक्त (महसुल) रमेश काळे यांनी दिली.
राज्य शासनाच्या आदेशान्वये कोविड निर्बंध उठविण्यात आलेले आलेले आहेत. तथापि, सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने नागरिकांना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवण इत्यादींबाबींचे अनुकरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सदर विभागीय लोकशाही दिन विभागातील दहा विभाग प्रमुखांच्या उपस्थित आयोजित करण्यात येणार आहे.