ब्रेकिंग

पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान योजनेसाठी*  *4 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

 

 

*पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान योजनेसाठी*

*4 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

 

*नाशिक, दि. 22 डिसेंबर, 2023 वृत्तसेवा) :*

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्यादृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबत योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांचे स्तरावरुन सुरू आहे. या योजनेकरिता दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 4 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संतोष शिंदे यांनी दिली आहे.

 

या योजनेचा उद्देश हा दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे असा आहे. या योजनेचा लाभ गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नावनोंदणी (अर्ज) करण्यासाठी पोर्टल दिनांक 3 डिसेंबर, 2023 रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविणेसाठी https://evehicleform.mshtdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री. शिंदे यांनी केले आहेत.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे