भुसे ग्रामस्थांच्यावतीने बाळासाहेब सोनवणेसर यांचा सत्कार

भुसे ग्रामस्थांच्यावतीने बाळासाहेब सोनवणेसर यांचा सत्कार
नाशिकजनमत प्रतिनिधी:=
निफाड तालुक्यातील भुसे या ठिकाणी गावकऱ्यांच्यावतीने मांजरगाव येथील भूमिपुत्र, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष,डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक,तसेच महिरावणी येथील मातोश्री गि. दे.पाटील माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक बाळासाहेब दादा सोनवणे यांना शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘आदर्श शिक्षक तसेच समाजभूषण पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व गोदाकाठचे सामाजिक कार्यकर्ते चिंतामण सोनवणे,सरपंच कारभारी बेंडकुळे,नवनाथ भुसारे,शिवाजी आघाव, प्रभाकर सोनवणे, मधुकर पोटे, रामनाथ फड,माजी सरपंच ज्ञानेश्वर पोटे, बाळू भुसारे नवनाथ पोटे रामदास सोनवणे, रामदास पोटे,निवृत्ती बोडके, दिलीप पोटे,संजय सोनवणे,दत्तू आघाव,मनोहर सोनवणे,किरण पोटे, गंगा आघाव इत्यादी मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.यावेळी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चिंतामण पाटील सोनवणे यांनी बाळासाहेब सोनवणे यांच्या शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक कार्याविषयी माहिती देत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी बाळासाहेब सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करत भुसे ग्रामस्थांच्यावतीने केलेल्या सत्काराबद्दल ऋणनिर्देश व्यक्त केले.
*फोटो कॅप्शन -*
भुसे येथे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त बाळासाहेब सोनवणेसर यांचा सन्मान करताना नवनाथ भुसारे समवेत चिंतामण सोनवणे,सरपंच कारभारी बेंडकुळे,शिवाजी आघाव, प्रभाकर सोनवणे, मधुकर पोटे,माजी सरपंच ज्ञानेश्वर पोटे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.