ब्रेकिंग
तेली समाजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पत्रकारांचा सन्मान. व सत्कार सोहळा.
- नाशिक जनमत “नवीन नाशिक तेली समाजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व पत्रकारांचा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला.
संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्ताने श्री संत जगनाडे महाराज सेवा मंडळ, संताजी युवक मंडळ, व सर्वांगीणी महिला मंडळ. आयोजित भव्य रौप्यमहोत्सवी विद्यार्थी गुणगौरव सोहळा समारंभाचे आयोजन कामटवाडे येथील माऊली लॉन्स येथे करण्यात आले होते. तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधत नवीन नाशिक मधील पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी मंडळाच्या वतीने पवन नगर स्टेडियम येथून संताजी महाराजांच्या पालखीचे व रथोत्सवाचे मिरवणुकीला मंडळाचे मार्गदर्शक श्री बी. जी. दादा चौधरी ,समाजसेवक देवा भाऊ वाघमारे, संतोष चौधरी, मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव चौधरी, राहुल गणोरे, यांच्या हस्ते नारळ वाढून भव्य पालखी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी समाज बांधव माता भगिनी तसेच बालगोपाळ मोठ्या संख्येने विविध वेशभूषा करून पालखी दरम्यान उपस्थित होते. मिरवणूक पवन नगर स्टेडियम,पवन नगर मार्केट, रायगड चौक, सावता नगर, दिव्या अैडलब, कांकरिया ज्वेलर्स, मोरे हॉस्पिटल मार्गे कामटवाडे येथील माऊली लॉन्स येथे मिरवणुकीचा समारोप झाला. व पुढील कार्यक्रम विद्यार्थी गुणगौरव भव्य असा लकी ड्रॉ धमाक्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. पालखी सोहळ्याचे आयोजक डॉ.राम बोरसे, अर्जुन वेताळ, शुभम नेरकर यांनी केले.विद्यार्थ्यांसाठी बक्षिसाचे नियोजन बी. जी. दादा चौधरी यांनी दिले, तसेच समाज बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था श्रीमती आशाताई चौधरी व देवा भाऊ वाघमारे यांनी केले. समाजाचा विकासासाठी तेली समाजाने भरीव योगदान दिले असून रौप्यमहोत्सवाच्या या कार्यक्रमाचे कौतुक माजी नगरसेवक गजानन शेलार यांनी भाषणातुन केले तसेच आपल्या मुलांना परदेशात पाठवू नका, हुशार मुलांना आपल्या देशाची सेवा करण्यासाठी देशातच ठेवा, परदेशी लोकांच्या सेवेसाठी आपली गुणवत्ता वाया घालवू नका. असे प्रतिपादन तैलिकमहासभेचे महासचिव डॉक्टर भूषण कर्डिले यांनी समाजाला आपल्या भाषणाद्वारे संबोधित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री संतोष चौधरी हे होते. व्यासपिठावर डॉ.शरद महाले, तेली समाजभुषण बी. जी. दादा चौधरी ,डॉ. सुरेश सूर्यवंशी, अैड. निलेश चौधरी, श्रीमती आशाताई चौधरी, देवा भाऊ वाघमारे, राहुल गणोरे, व्ही. डी.पाटील, विठ्ठलराव शेलार, डॉ.नितीन चौधरी, डॉ.गोविंद चौधरी, डॉ.सुनील चौधरी,सागर चोथेपाटील, सागर कर्पे, संदीप कोते , दिलीप चौधरी ,नरेंद्र चौधरी, जगन्नाथ चौधरी, रमेश चौधरी, मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव चौधरी ,महिला शहराध्यक्ष सौ मनीषा मोरे, सर्वांगिणी महिला अध्यक्ष सौ सरिता सोनवणे, प्रांतिक तैलिक महासभा महिला जिल्हाध्यक्षा सौ सुनीता बोरसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ संगीता पवार, प्रास्ताविक श्री अर्जुन वेताळ तसेच आभार प्रदर्शन नामदेव चौधरी यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष श्री शिवाजी चौधरी, उपाध्यक्ष विनायक सोनवणे, सचिव वसंत चौधरी, सहसचिव अर्जुन वेताळ, खजिनदार नामदेव चौधरी, सहखजिनदार दिगंबर नेरकर, विजय चौधरी ,रमेश चौधरी, दिलीप चौधरी, नितीन पवार, रवींद्र चौधरी ,संजय पाटील ,राम बोरसे, रघुनाथ चौधरी, सागर पवार, सुधीर चौधरी, प्रदिप कोते, पुंडलिक चौधरी, आनंदा चौधरी, सर्वांगिणी महिला मंडळ अध्यक्षा सौ सरिता सोनवणे, सोनाली चोथे पाटील, वर्षा वेताळ ,सुनीता बोरसे, सुवर्णा कोते ,संगीता कोते ,निर्मला चौधरी,उषा चौधरी, कौशल्या चौधरी, ललीता चौधरी, अैड.सरिता सोनवणे, भारती चौधरी, सोनाली चौधरी, शोभा चौधरी, रत्ना चौधरी ,निशा चौधरी. तसेच संताजी युवक मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी, मोहित पन्हाळे ,तुषार महाले, शिवप्रसाद शिरसाट ,अमर व्यवहारे, शुभम नेरकर, सतीश काळे, अभिजीत बारगजे, किरण वेताळ, योगेश चौधरी ,सोपान चौधरी ,विकी बागुल, राहुल चौधरी ,हर्षल चौधरी, तसेच नवीन नाशिक मधील सर्व समाज बांधव भगिनी बालगोपाळ यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. लकी ड्रॉ 5 मोठे बक्षीस चे प्रायोजक योगेश चौधरी, भारत चौधरी , चांदीचे नाणे लकी ड्रॉ प्रायोजक डॉ. राम बोरसे व सुनिता बोरसे हे होते. बक्षीस वाटप, सत्कार सोहळा आटोपल्यानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था सर्व समाज बांधवांना करण्यात आलेली होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव चौधरी,विनायक सोनवणे, नितीन पवार, अर्जुन वेताळ, रविंद्र चौधरी, राम बोरसे, कैलास चौधरी यांनी परिश्रम घेतले.