मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑटो रिक्षा सजावट स्पर्धा…!*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑटो रिक्षा सजावट स्पर्धा…!*
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकचे महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी इदगाह मैदान, गोल्फ क्लब या ठिकाणी ऑटो रिक्षा सजावट स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेमध्ये नाशिक शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा चालकांनी आपल्या सजविलेल्या रिक्षा चालवत आणून स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.
कोल्हापूर, पुणे, नागपुर आणि मुंबई या ठिकाणच्या ऑटो रिक्षा ह्या अतिशय छान सजविलेल्या असल्याने अनेकांना रिक्षा मध्ये बसून किंवा बाहेर उभे राहून फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण नाशिकचे पालक मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, सह संपर्कप्रमुख राजू लवटे, महानगरप्रमुख प्रविण तिदमे, उपमहानगरप्रमुख सुधाकर जाधव, प्रविण काकड, महिला जिल्हाप्रमुख लक्ष्मी ताठे, पुजा धुमाळ, महिला महानगरप्रमुख अस्मिता देशमाने, युवासेना महानगरप्रमुख दिगंबर नाडे, उपमहानगरप्रमुख अक्षय कलंत्री, कल्पेश कांडेकर, नविन नाशिक विभाग प्रमुख राजेंद्र मोहिते, नितीन अमृतकर, उपविभाग प्रमुख तथा नाशिक शहर मीडिया समन्वयक सागर चौधरी, उप महानगर संघटक हर्षल दाणी, अमित खांदवे, संदीप लभडे, शाखा प्रमुख धवल दरंगे, जुने नाशिक विभाग प्रमुख काशीद पिरजादा आदी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.