अंबड पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी. 64 हजाराचा मुद्देमाल जप्त.
:नाशिक जनमत : अंबड पोलीसांनी गुरनं ३७५/२०२२ भादवि.क ३८० मध्ये ०१ आरोपी व ०४ विधीसंघर्षित बालक यांचेकडुन एकुण ६४,०००/- रूपये किंमतीचा मुददेमाल केला जप्त करून केली उत्कृष्ट कामगिरी
अंबड पोलीस ठाणे, नाशिक शहर येथे दिनांक १३/०८/२०२२ रोजी चे सकाळी ०९:०० चा पासुन दिनांक १४/०८/२०२२ रोजीचे सकाळी ०९:०० वा चे दरम्यान वैभव इंडस्ट्रि प्लॉट नं एवं ३२, एम आय डी सी अंबड नाशिक येथील कंपनीतील कोणीतरी अज्ञात चोरट्याने एक ४०००/- कि चे एक १४ इंची हॅन्डकटर मशीन १००००/- रु कि ची एक नट बोल्ट बेअरींग ची गोणी, २० किलो वजनाचे ५१ नग लोखंडी घडी असे वर्णनाचा एकुण ६४०००/- रु कि चा मुद्देमाल चोरून नेला असल्याने अंबड पोलीस ठाणे येथे गुर नं ३७५ / २०२२ भाविक ३८० प्रमाणे दिनांक १४/०८/२०२२ रोजी २३:०० वा गुन्हया दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांची काही एक माहिती नसतांना पोशि योगेश शिरसाठ व पोशि मुकेश गांगुर्डे यांनी गोपनीय माहितीदारांमार्फत माहिती घेवुन बातमी प्रमाणे मा. पोलीस आयुक्त श्री. जयंत नाईकनवरे साहेब, मा. पोलीस उप आयुक्त श्री विजय खरात, परिमंडळ-०२, सहा पोलीस आयुक्त सोहेल शेख, अंबड विभाग, तसेच अंबड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक श्रीकांत निबांळकर (गुन्हे) यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सपोनि शिंदे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवून त्यांचा नमुद गुन्हयात सहभाग निष्पन्न करून, यातील आरोपी नामे १) गुणवंत भाऊसाहेब बळसाणे व ०४ विसंबा यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन एकुण ६४०००/- हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कारवाई सपोनि शिंदे, पोशि योगेश शिरसाठ, पोशि मुकेश गांगुर्डे, पोशि तुषार देसले, पोशि प्रविण राठोड, पोशि किरण सोनवणे, पोशि प्रशांत अशांनी मिळून सापळा रचुन नमुद गुन्हयांतील आरोपीतांना ताब्यात घेवुन नमुदवा गुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास पोहवा परदेशी व पोशि शेख हे करत आहेत.: