येवला लासलगाव मतदार संघातील उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांना राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा-आण्णासाहेब कटारे.

*येवला लासलगाव मतदार संघातील उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांना राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा-आण्णासाहेब कटारे*
*नाशिक,येवला:-* येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांना राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने जाहीर पाठिंबा दिल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने आज छगनराव भुजबळ यांची समक्ष भेट घेऊन पत्रकार परिषदे द्वारे त्यांना जाहीर पाठिंबा, समर्थन जाहीर केले आहे.
येवला मतदारसंघ हा २० वर्षांपूर्वी दुर्लक्षित असा होता परंतु छगन भुजबळ यांनी गेल्या २० वर्षात येवला मतदार संघाचा कायापालट केला आहे. शेतकऱ्यांचे,शेतमजुरांचे, व्यापारी वर्गाचे प्रश्न मार्गी लावण्याची सकारात्मक भूमिका वारंवार घेतली आहे,सर्वच समाज घटकांना मिळणारी योग्य वागणूक छगन भुजबळांच्या जमेची बाजू आहे.
मांजरपाडा पाणी प्रकल्प अनेक वर्षापासून प्रलंबित होता परंतु भुजबळांनी तो प्रश्न देखील मार्गी लावल्याने समस्त शेतकरी वर्ग छगनराव भुजबळ यांना धन्यवादच देत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी येवला मुक्कामी धर्मांतराची घोषणा 1935 साली केली व 1956 ला नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. 1956 ते 2004 पर्यंत येवला मुक्ती भूमी येथे बौद्ध बांधवांना कुठली सुविधा नव्हती परंतु अलीकडे भुजबळांनी मुक्ती भूमीची भव्य दिव्य इमारत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा दिमाखदार ब्राँझ धातूचा भव्यदिव्य पुतळा उभारून समस्त बौद्ध समाजामध्ये एक आदराचे स्थान निर्माण केले आहे.
भुजबळांसारखा लोकप्रतिनिधी विधानसभेत जाणे आवश्यक आहे ते राज्यपातळीवरील नेते आहे त्यांच्या नेतृत्वात अनेक प्रलंबित प्रश्न देखील मार्गी लागू शकतील असा विश्वास आहे.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील समस्त नेते कार्यकर्ते पदाधिकारी छगन भुजबळ यांच्या प्रचार यंत्रणेत आज पासून सहभागी होणार असून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, मेहनत घेणार असल्याचेही अण्णासाहेब कटारे यांनी शेवटी सांगितले.
पत्रकार परिषदे प्रसंगी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे सल्लागार नंदकुमार जोशी, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शांताराम बापू थोरे, महारष्ट्र युवा नेतृत्व बिपिन कटारे,जिल्हा नेते पंढरीनाथ आव्हाड, नाशिक युवा जिल्हाध्यक्ष जितू भाऊ बागुल, येवला युवा नेते तुषार भाऊ वाघ,लासलगाव संदीप बनसोडे,प्रवक्ते सुभाष आंबेकर,महिला आघाडी नेत्या मीनाताई भालेराव, गौतम दोंदे, युवा नेते प्रतीक सोनटक्के, आकाश आव्हाड, बबन वाघ, प्रशांत शिंदे, राजेंद्र भालेराव आदी उपस्थित होते.