प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणार्या सर्व शेतकरी व लाभार्थ्यांनी फसव्या संकेतस्थल व भ्रमणध्वनी पासून सावध राहावे.
दि.१६ जून, २०२२
*प्रधानमंत्री ‘कुसुम’ योजनेतंर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकरी व लाभार्थ्यांनी फसव्या संकेतस्थळ व भ्रमणध्वनी पासून सावध रहावे*
*दि.१६ जून, २०२२
प्रधानमंत्री ‘कुसुम’ योजना अंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना व लाभार्थ्यांना जागृत करण्यात येते की काही बनावट संकेतस्थळ, मोबाईल ॲप, दूरध्वनी व भ्रमणध्वनी द्वारे या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना सौर पंप मिळण्यासाठी अर्ज करण्यास, नोंदणी शुल्क आणि सौर पंपाची किंमत ऑनलाइन भरण्यास सांगत आहे अशा खोट्या फसव्या संकेतस्थळांना मोबाईल आपला भेट देऊ नये, असे आवाहन महाऊर्जा विभागीय कार्यालय नाशिकचे विभागीय व्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
प्रधानमंत्री ‘कुसुम’ योजना अंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना व लाभार्थ्यांनी खोट्या फसव्या दूरध्वनी भ्रमणध्वनी संभाषणाला आव्हानाला बळी पडू नये. तसेच सदर संकेतस्थळावर किंवा वापर कोणत्याही पद्धतीने पैशांचा भरणा करू नये, असेही श्री. कुलकर्णी यांनी कळविले आहे.
प्रधानमंत्री ‘कुसुम’ योजना राज्य सरकारच्या महाऊर्जा या विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. सदर योजना सुरू करतेवेळी याबाबत वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. योजनेच्या अधिक माहितीसाठी महाऊर्जाच्या www.mahaurja.com या संकेतस्थळावर किंवा विभागीय कार्यालय महाऊर्जा, नाशिक, जिल्हा कार्यालय महाऊर्जा धुळे जळगाव अहमदनगर येथे प्रत्यक्ष भेट द्यावी, असेही श्री.कुलकर्णी यांनी कळविले आहे