राजकिय
*विभागीय आयुक्त कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*

*विभागीय आयुक्त कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*
*नाशिक, दि. १४ एप्रिल,२०२३ (विमाका वृत्तसेवा)*
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त (सा. प्र.) रमेश काळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात डॅा. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी नगरपालिका प्रशासनाचे प्रादेशिक संचालक संजय दुसाने, तहसीलदार साहेबराव सोनवणे, योगेश शिंदे, अधिकारी व कर्मचारी यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.