सर्व सामान्यांचा पत्रकार लक्ष्मण सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना फळे वाटप..
सर्व सामान्यांचा पत्रकार लक्ष्मण सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना फळे वाटप
नाशिक ( प्रतिनिधी ) वाढदिवसाचा होणारा वारेमाप खर्च टाळून जन्मदिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने सामाजिक हेतूने उपक्रम राबविल्यास गोरगरिबांना त्याचा फायदा मिळेल. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या संयोगाने सर्व सामान्य जनतेचे पत्रकार लक्ष्मण सोनवणे यांनी राबविलेला सामाजिक उपक्रम नक्कीच प्रेरणादायी असल्याचे घोटीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश गोरे यांनी केले. येथील ग्रामीण रुग्णालयात बेलगाव कुऱ्हेचे पत्रकार लक्ष्मण सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त दवाखान्यातील रुग्णांना
सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून फळे, बिस्किटे वाटप करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयात अनेक आदिवासी गोरगरीब रुग्ण उपचारासाठी मोठ्या संख्येने येत असतात. याचे जन्मदिनाचे औचित्य साधीत सोनवणे यांनी फळे, बिस्किटे वाटप केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश गोरे यांनी पत्रकार लक्ष्मण सोनवणे यांना जन्मदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. प्रहार सैनिक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष विजय कातोरे म्हणाले की, उपक्रमाचा आदर्श घेऊन अनाथ आश्रम आदी ठिकाणी असे कार्यक्रम राबविल्यास गोरगरीब दुवा देतील. यावेळी सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष नारायण बाबा जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रताप जाधव, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे, छावा संघटनेचे अध्यक्ष गोकुळ धोंगडे वस्ताद मल्हारी दालभगत, गणेश भोर, किशोर जाधव, सामाजिक कार्यकर्ते सागर गावंडे, पत्रकार गोपाल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जगताप, सुनील शिंदे आदी उपस्थित होते.