प्रकाशजी धारिवाल कार्डियाक सेंटरच्या उदघाट्नची तयारी उत्साहात*… *विविध सामाजिक संस्था प्रमुख व मान्यवरांची नामको हॉस्पिटलला भेट..*
*प्रकाशजी धारिवाल कार्डियाक सेंटरच्या उदघाट्नची तयारी उत्साहात*…
*विविध सामाजिक संस्था प्रमुख व मान्यवरांची नामको हॉस्पिटलला भेट..*
नामको हॉस्पिटल येथे शनिवार दि. १८ मार्च २०२३ रोजी होणाऱ्या प्रकाशजी धारिवाल कार्डियाक सेंटरच्या उदघाट्नची तयारी उत्साहात सुरु झाली आहे.
२०१५ साली फक्त ३० बेड्चे कॅन्सर हॉस्पिटल आज मल्टी – सुपर स्पेशालिटी कार्डियाक केअर सह ३०० बेडचा टप्पा पार करणार आहे. रुग्णसेवेचा वाढत्या कक्षा व विविध नवनवीन यंत्रणांची माहिती सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचावी या हेतूने आज नामको हॉस्पिटलला शहरातील विविध सेवाभावी सामाजिक संगठना, समाज मंडळे, नामको बँकेचे अध्यक्ष व संचालक तसेच इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचे शुभहस्ते व कार्डियाक केअर सेंटरचे दानदाते श्री. प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. नामको बँकेचे अध्यक्ष श्री. वसंतभाऊ गीते, श्री. विजयजी साने, श्री. हेमंतजी धात्रक, श्री अशोकआबा सोनजे, प्रशांतभाऊ दिवे तसेच श्री. हरीशभाऊ लोढा, श्री. गौतमजी सुराणा, श्री. सुभाषजी भंडारी,
श्री. ललितजी छाजेड, श्री सागरजी भटेवरा, श्री. सुनीजी बुरड, श्री. अनिलजी लोढा, श्री. नितीनजी पाठक या मान्यवरांनी आज नामको हॉस्पिटलला भेट दिली. नामको हॉस्पिटलचे अध्यक्ष श्री. सोहनलालजी भंडारी यांनी दानदाते श्री प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या दातृत्वामुळे आज संस्थेचा प्रगतीचा वेग दुप्पट झाला असून कँसर बरोबरच इतर सर्व आजारांसाठी नामको हॉस्पिटल हे वरदान ठरणार असल्याचे सांगून श्री प्रकाशभाऊ धारिवाल यांचे ऋण व्यक्त केले. नामको हॉस्पिटलचे सचिव श्री. शशिकांत पारख यांनी सर्व उपस्तित मान्यवरांना नवीन सुरु होणाऱ्या कार्डियाक केअर विभागाची सविस्तर माहिती दिली व संस्थेच्या व दान दात्यांच्या योगदानाचा पुरेपूर लाभ प्रत्येक रुग्णाला कसा मिळेल याकडे संस्था कटाक्षाने लक्ष देत असते असे सांगून मा. नितीनजी गडकरी यांच्या भेटीमुळे हॉस्पिटलला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळणार असल्याचे सांगितले व या उद्घटनाच्या कार्यक्रमाला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्तित राहून संस्थेला उपकृत करावे असे आवाहन केले. चहापान व अल्पोपहाराने या भेटीची सांगता झाली.