ब्रेकिंग

फैजपूर जवळच असलेल्या वढोदे येथे निष्कलंक धाम परिसरा* *’समरसता महाकुंभ’ भूमिपूजन व ध्वजारोहण सोहळा संपन्न*

*फैजपूर जवळच असलेल्या वढोदे येथे निष्कलंक धाम परिसरा*

*’समरसता महाकुंभ’ भूमिपूजन व ध्वजारोहण सोहळा संपन्न*

 

समाजात आनंद निर्माण व्हावा, सर्व भेदांच्या भिंती तोडून एकरूप व्हावे, माणूस म्हणून आपण एकत्रित यावे, सर्व समाज सर्वसमावेशक असावा हा कार्यक्रमा मागचा उद्देश आहे. आपण सर्वांनी निमंत्रित न राहता आपला कार्यक्रम समजून स्वयंस्फूर्तीने सर्वांनी “समरसता महाकुंभाला” उपस्थित रहावे असे आवाहन महामंडलेश्वर प.पू. जनार्दन हरिजी महाराज यांनी केले आहे.

वढोदे येथील निष्कलंक धाम परिसरात दिनांक २९, ३०, ३१ डिसेंबर २०२२ रोजी सतपंथ चारिटेबल ट्रस्ट फैजपूर व अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार आयोजित समरसता महाकुंभाची तयारी प्रगतीपथावर असून आज दि.१५ डिसेंबर २२ रोजी सकाळी १०-०० निष्कलंक धाम येथे समरसता महाकुंभाचे भूमिपूजन तसेच समरसता ध्वजाचा रंग एका संप्रदायाचा न देता विविधतेत एकता असलेल्या अशा भगव्या रंगाच्या धर्म ध्वजाचे अनावरण संत-महंतांच्या ऊपस्थितीत संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.

हृदयात समरसतेचा भाव असल्यास सर्व समाज एकत्र होतो. मानवास महामानव बनविण्यासाठी हा महाकुंभ आहे. एकात्मता निर्माण करण्यासाठी ही सर्जनात्मक कृती प.पू. जनार्दन हरिजी महाराज यांनी हाती घेतली असल्याचे स्वामीनारायण गुरुकुलचे शास्त्री भक्ती प्रकाशदासजी महाराज यांनी सांगितले.

सर्वांप्रती सामाजिक दृष्टिकोन असलेले परमपूज्य जनार्दन हरीजी महाराज यांनी सामाजिक एकात्मतेसाठी या महाकुंभाचे आयोजन केले ही आपणा सर्वांसाठी भाग्याची बाब आहे. धर्मामुळे समाजात शांती निर्माण होते त्यासाठी गुरु मार्गदर्शन करतात तेव्हा त्यांच्या शब्दांना प्रमाण मानून आपण तन मन धनाने समर्पित वृत्तीने सर्वांनी सहभाग द्यावा असे आवाहन करून या आयोजनासाठी प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार शिरीष दादा चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळी राष्र्टीय स्वयसेवक संघ पश्चिम क्षेत्र सदस्य निलेश गद्रे यांनीही मार्गदर्शन केले. उपस्थित सत्कारमूर्ती संतांचा सत्कार श्री कातीभाई पटेल व राजुभाई पटेल नाशिक यांनी यावेळी केला.

 

(कार्यक्रमात समरसता महाकुंभ है…भारत का गुणगान हैं… वो माता का सन्मान हैं…! हे सौ. सुचिता श्रीकांत रत्नपारखी यांनी तयार केलेली रचना व गायन व कु. राजेश्वरी, ज्ञानेश्वरी श्रीकांत रत्नपारखी यांनी बासरी, संगीत, कोरस दिलेले गीत उपस्थित मान्यवरांचे अनावरण केले. त्याचप्रमाणे देणगी पावत्या न छापता समरसता महाकुंभ स्मृती कुपनाचे ही अनावरण करण्यात आले.)

या कार्यक्रमाच्या उपस्थितीसाठी कोणालाही अधिकृत आमंत्रण दिले नसतांना मोठ्या संख्येने भाविक-भक्त,स्वयंसेवक उपस्थित राहिले याबद्दल महाराजांनी सर्वांचे मनापासून अभिनंदन स्वागत केले.

यावेळी प.पु. सुरेशशास्त्री मानेकर बाबा(सावदा), प.पू. श्री श्याम चैतन्यजी महाराज जामनेर, प.पू.स.शास्त्री भक्तीप्रकाशदासजी महाराज, प.पू. शास्त्री भक्तीकिशोर दासजी महाराज, हभप. मधुकर महाराज खानापूर, हभप रविंद्र महाराज हरणे, हभप. उद्धव महाराज, हभप नितीन महाराज, आ. शिरीषदादा चौधरी, राष्र्टीय स्वयंसेवक संघ पश्चिम क्षेत्र कार्यकारणी सदस्य निलेश चंद्रकांत गद्रे भुसावळ, सामाजिक सभासद प्रमुख प्रमोद दांडगे, ब्रम्हकुमारी मिरादीदी, मसाका माजी चेअरमन शरद महाजन, माजी मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, *भारतीय मिडिया फाऊंडेशन महाराष्र्ट राज्य चेअरमन हिरालाल लोथे*, डॉ. केतकी पाटील, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, हभप प्रवीणदास महाराज, पवनदास महाराज, पूज्य राममनोहरदास महाराज, हभप धनराज महाराज अंजाळे, प्रांताधिकारी कैलास कडलग, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगांवरकर, परिसरातील सर्व समाज बांधवांचे प्रतिनिधी यांच्यासह गुजरात, मुंबई, पुणे, नाशिक व पंचक्रोशीतील भाविक भक्त तसेच सामाजिक, राजकीय पदाधिकारी, शासकीय व प्रशासकीय मंडळी, पत्रकार स्वयंस्फूर्तीने यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे