वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य आयोजित पहिल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे साक्षीदार व्हा* : बाळासाहेब घुगे
*वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य आयोजित पहिल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे साक्षीदार व्हा* : बाळासाहेब घुगे
वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी आयोजित पहिल राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक नगरी नाशिक येथे होत असुन हा क्षण साहित्य क्षेत्रासाठी एक पर्वणीच आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा असं मत या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष प्रशांत आंधळे यांनी व्यक्त केले दिनांक 25/12/2022 रविवार नशिक येथे एकदिवसीय साहित्य संमेलन होत आहे सकाळी 8 :00 वाजता ग्रंथ दिंडी उत्साहात प्रारंभ होईल नंतर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृह गंगापूर रोड नाशिक येथे शहरात सकाळी 9 : 00 ग्रंथ दिंडी निघेल व शुभारंभ होईल पहिल सत्र उद्घाटन समारंभ असेल दुसरं नंतर भोजन आणि तदनंतर कथा कथन परिसंवाद होईल अंतिम सत्र कवी संमेलन होईल या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून विदर्भ रत्न बाबारावजी मुसळे व समेलन अध्यक्ष प्रा.वा.ना.आंधळे हे लाभले असुन प्रमुख पाहुणे म्हणून मा ना नरहरी झिरवाळ साहेब ,उप सभापती महाराष्ट्र विधानसभा गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक, काकासाहेब खांबाळकर जेष्ठ साहित्यिक विचारवंत ह भ प डॉ तुळशीदास महाराज गुट्टे, संस्थापक अध्यक्ष सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन नशिक ,मंचक इप्पर , पोलिस अधीक्षक नाशिक, मा विधिज्ञ जंयत जायभावे , मेंबर बार कौन्सिल ऑफ इंडिया डि एल कराड कामगार नेते , कांचनताई खाडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष भटके विमुक्त घुमांतुक परिषद,विजय दहीफळे सुप्रसिद्धी डॉक्टर आरती मोराळे मोराळे ऍग्रो प्रॉडक्ट औरंगाबाद ,हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रशांतजी आंधळे व त्यांचे सहकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. तसेच वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी च्या मार्गदर्शक साहित्यिक तथा प्रकाशक सौ लता गुठे, साहित्य आघाडीच्या राज्य सरचिटणीस सु प्रसिद्ध कवयित्री सौ सिंधुताई दहिफळे, राज्य संघटक लेखक कवयित्री,सौ सुषमा सांगळे वनवे, महिला साहित्य आघाडीच्या अध्यक्ष सौ शितल नागरे चोले संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.तसेच या संमेलनासाठी राज्यातील ज्येष्ठ तथा नवकवी साहित्यिक उपस्थित राहणार आहेत या या अनुषंगाने ग्रामीण साहित्य स्वर्गिय सुंदराबाई मुरलीधर आंधळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी राज्यस्तरीय साहित्य रत्न पुरस्कार 2022 देण्यात येणार आहे. भव्य दिव्य होणार या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त साहित्यिक विचारवंत लेखक नवं कवी यांनी उपस्थित राहव आणि नव चैतन्य उर्जा घ्यावी आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन संमेलनाचे स्वागत अध्यक्ष प्रशांतजी आंधळे यांनी व्यक्त केले .हे साहित्य समेलन यशस्वी पणे पार पाडन्यायासाठी आयोजन समिती चे सर्व सदस्य श्री बुधाजीराव पानसरे (उद्योगपती), के.के.सानप , श्री अनिल सानप सर, श्री बाळासाहेब घुगे , श्री रंगनाथ दरगुडे ,डाॅ.रघुनाथ बोडके, अॅड.प्रतिभा आंधळे , श्री शिवाजीराव वंजारी,श्री रमेश आव्हाड,डाॅ.मंजुषा दराडे ,डाॅ.दत्तात्रय बेदाडे , डाॅ.सारंग दराडे , श्री अभिजीत दिघोळे(सर्व समाजसेवक) सह नाशिकचे इतर समाज बांधव अहोरात्र मेहनत करत आहे.