धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य अभियान;* *तपासणी मोहिमेस उस्फूर्त प्रतिसाद*
दिनांक: 15 डिसेंबर, 2022
*धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य अभियान;*
*तपासणी मोहिमेस उस्फूर्त प्रतिसाद*
*नाशिक, दिनांक: 15 डिसेंबर, 2022
जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून जिल्हापातळीवर धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य अभियानास 14 डिसेंबर 2022 पासून सुरूवात झाली आहे. या अभियांनातर्गत तपासणी मोहिमेस उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले आहे.
धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य अभियानात 31 डिसेंबर 2022 पर्यंत ग्रामपातळीवर घरोघरी जाऊन प्राथमिक आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी मोहिमेत 15 डिसेंबर रोजी 29 हजार 589 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून रूग्णांना जवळच्या ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयात तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना संलग्नित रूग्णालयांमध्ये 102 रूग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे 1 हजार 809 रूग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भीत करण्यात आले आहे अशी माहिती डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे.
या अभियानाच्या अनुषंगाने 1 जानेवारी ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत संदर्भ सेवा शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महाआरोग्य अभियानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले आहे.