ब्रेकिंग

डाक विभागात अभिकर्त्यांची थेट भरती*

*डाक विभागात अभिकर्त्यांची थेट भरती*

*नाशिक, दिनांक: 13 डिसेंबर, 2022(जिमाका वृत्तसेवा):*
नाशिक डाक विभागात टपाल जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट मुलाखतीद्वारे अभिकर्त्यांची (विमा एजंट) नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमदेवारांनी मंगळवार 27 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता प्रवर डाक अधीक्षक नाशिक कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन नाशिक टपाल विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केले आहे.

अभिकर्ता पदासाठी पात्रता व अटी
▪️ उमेदवार इयत्ता १० वी अथवा समतुल्य परिक्षा पास असावा.
▪️ उमेदवाराचे वय 18 ते 50 दरम्यान असावे
▪️ उमेदवारास संगणकाचे आणि स्थानिक ठिकाणांचे ज्ञान असावे
▪️ उमेदवार कोणत्याही आयुर्विमा कंपनाचा एजंट नसावा.
▪️ उत्तीर्ण उमेदवास रू 5 हजार राष्ट्रीय बचत पत्र (NSC) सुरक्षा ठेव स्वरूपात भरणे बंधनकारक असेल.
▪️प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपाचा परवाना देण्यात येईल. नंतर IRDA ची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारास कायम करण्यात येईल.
▪️उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संवाद कौशल्य, जीवन विमा बाबत ज्ञान या आधारावर करण्यात येईल.

उमेदवाराने मुलाखतीस शैक्षणिक कागदपत्र, 3 फोटो, पॅन कार्ड व आधार कार्ड सहित स्वखर्चाने उपस्थित रहावे. अर्जाचा नमुना प्रवर अधीक्षक कार्यालय नाशिक किंवा जवळच्या कोणत्याही पोस्ट कार्यालयात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी पी.एल.आय विकास अधिकारी अभिजित वानखेडे यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 9767165161 यावर संपर्क साधावा.
0000000000

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे