घर सुंदर ठेवण्याचे काम स्त्रीच करू शकते ब्रह्मकुमारी वासंती दीदी.
*घर सुंदर ठेवण्याचे काम स्त्रीच करू शकते- ब्रह्माकुमारी वासंतीदीदी*
प्रजापिता ब्रह्माकुमारीच्यीवतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन
नाशिक | वार्ताहर | “नारी तू नारायणी लक्ष्मी बन सकती है|” प्रत्येक स्त्रीला आपल्या कुटुंबातील सर्वांचीच काळजी घ्यावी लागते.एक स्रीच घराला सुंदर ठेवून स्वर्ग बनवण्याचे काम करू शकते.असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्या जिल्हा संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंतीदीदी यांनी केले. नाशिक येथील ‘प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय’च्यावतीने जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रभुप्रसाद या जिल्हा मुख्यालयात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर नाशिक जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड,ममता छाजेड, शिल्पा अवस्थी, दैनिक सकाळ ‘तनिष्क’चे नाशिक समन्वयक विजय,आदर्श शिक्षिका कुंदा बच्छाव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या की प्रत्येकाने आपली मानसिकता बदलली तरच घरचे वातावरण बदलू शकते.आपल्यातील अहंकार, मीपणा, क्रोध इत्यादी वर मात करत आपले कर्म,व्यवहार श्रेष्ठ केले पाहिजेत.पूर्ण आयुष्यभर उत्तम कार्य करत त्याद्वारे सर्व आत्मरुपी व्यक्तींचे कल्याण व्हावे हाच विचार आपल्याजवळ असला पाहिजेत.त्या सुख,शांती, आनंद यांचा अनुभव ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या सेवा केंद्राद्वारे मिळत असतो तरी सर्वांनी या ठिकाणी प्रवेश घेऊन मिळवला पाहिजे असे आवाहन ब्रह्मकुमारी वासंतीदीदी यांनी केले. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी बोलताना महिलांमध्ये सर्वात प्रथम दांडगा आत्मविश्वास असला पाहिजेत. आपण जसे आहोत तसेच स्वतःला स्वीकारत आपले अस्तित्व एक व्यक्ती म्हणून बघितले पाहिजेत. स्वतःला कधीही महिलांनी कमी समजू नये आपण ज्या क्षेत्रात काम करत असाल त्यास न्याय दिला पाहिजे असे सांगून ब्रह्माकुमारी संस्थेने राबवलेला कर्तुत्ववान महिला गौरव कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे. यावेळी ममता छाजेड शिल्पा अवस्थी कुंदा बच्छाव इत्यादींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संजना पगार अभिनेत्री,
सविता चतुर अभिनेत्री,श्रुती भूतड़ा,डॉ शीतल सुरजसे,डॉ तेजु सोलोमन,डॉ उज्ज्वला निकम,डॉ सोनाली पाटील,विद्या घायतड,सुनीता जगताप,चेतना सेवक,नूपुर ठाकुर,एडवोकेट शेफाल,प्रणेता निकुंभ,मनीषा आमले,वैशाली कांकरिया,दिपाली वारुळे,सुवर्णा सोनवणे,अवनि अनिल मेहता,वैजयंती सिन्नरकर, वैशाली भामरे आदींसह कर्तृत्ववान महिलांचा सन्मानपत्र,स्मृतिचिन्ह, टोली देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक साप्ताहिक नाशिक परिसरचे दिलीप बोरसे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पूनमदीदी व ब्रह्माकुमारी पुष्पादीदी तर आभारप्रदर्शन ब्रह्माकुमारी ज्योतीदीदी यांनी केले.
- तत्पूर्वी ब्रह्मकुमार ओंकारभाई यांनी “नारी तू है गौरवगाथा..,नारी तू है भाग्यविधाता..|” हे सुमधूर गीताचे गायन करत सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच बाळ-गोपाळ मुलींनी सुंदररित्या सांस्कृतिक नृत्याचा अविष्कार करत प्रमुख पाहुण्यांबरोबर पुरस्कारार्थींना आकर्षित केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवा केंद्रातील सर्व सेवाधारी बंधू-भगिनींनी यांनी परिश्रम घेतले.