शेतात वेचून ठेवलेल्या आठ क्विंटल कापसावर चोरांचा डल्ला.
शेतात वेचून ठेवलेल्या कापसावर चोरांचा डल्ला
अरुण हिंगमीरे
जातेगांव, नांदगाव
जातेगांव (प्रतिनिधी)– नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकरी शरद लालचंद पवार यांच्या गट नंबर ४ येथून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रोहिले येथील शेतात दि.१९ नोव्हेंबर रोजी मोजून ठेवलेल्या १२ क्विंटल कापसापैकी त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी आठ क्विंटल कापूस एका चार चाकी वाहनामध्ये भरुन नेला असल्याची तक्रार नांदगाव पोलीस ठाण्यात पवार यांचे शेत वाट्याने करत असलेल्या अवधूत शिवाजी गायकवाड वय ३२ रा. रोहिला यांनी दिली आहे.
वरील घटनेमुळे नागरिक व शेतकरी बांधवांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून पोलीसांनी रात्रीच्या वेळी परिसरात फेर्या माराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.
गायकवाड यांनी म्हटले आहे की, मी रविवार दि. २० रोजी सकाळी शेतात गेलो असता तेथील कापूस साठवून ठेवलेल्या एका पत्र्याच्या शेडचा दरवाजा उघडा दिसल्याने जावून बघितले असता ठेवलेल्या कापसापैकी मोठ्या प्रमाणात कापूस कमी दिसल्याने मी आजूबाजूला चौकशी केली ते शेतात ठेवलेल्या आठ क्विंटल कापसाचे चोरीथे चार आठ क्विंटल कापसाची चोरीचाकी गाडीच्या टायराचे वन दिसून आले वरील सर्व प्रकाराच्या घडलेली हकिकत शेताचे मालक शरद पवार यांस सांगितली. त्यांनी व मी पुन्हा चौकशी केली परंतु चोरी झालेल्या कापसा बाबत काही समजले नाही. अशी तक्रार दाखल केली आहे.
वरील घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे पोलीस नाईक अनिल गांगुर्डे, प्रदिप बागूल यांनी पाहणी करुन पंचनामा केला असून
पुढील कार्यवाही करत आहे.