ब्रेकिंग

1700 दिवस सातत्यपूर्ण वाहतूक सुरक्षा अभियान राबवून नवीन जागतिक विक्रम – डॉ बी जी शेखर

1700 दिवस सातत्यपूर्ण वाहतूक सुरक्षा अभियान राबवून नवीन जागतिक विक्रम – डॉ बी जी शेखर

वाहतूक सुरक्षा ही जागतिक स्तरावर समस्या आहे .रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण खूप वाढले आहे. 15 ते 35 वयोगटात हे प्रमाण अधिक बघायला मिळते . हे कमी करायचे असेल तर जनजागृती करणे आवश्यक आहे . डॉ भानोसे गेली सतराशे दिवस रोज सकाळी व सायंकाळी हे अभियान सातत्यपूर्ण राबवत आहेत हे खरोखरच आदर्श व्रत आहे. समाजाने त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन या अभियानात सहभागी व्हावे व नासिक अपघात रहित करण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर यांनी केले.

गरुडझेप प्रतिष्ठानने 25 मार्च 2018 पासून रोज सकाळी व सायंकाळी वाहतूक सुरक्षा अभियान राबवत आहे. सतराशे दिवस पूर्ण करत नवीन जागतिक विक्रम रचला आहे. ह्या अभियानात संगीता भानोसे , संकेत भानोसे , रेणू भानोसे ,अजिंक्य तरटे ,सागर बोडके अविनाश क्षीरसागर ,अंजली प्रधान , हर्ष सोनवणे सहभाग नोंदवितात. डॉ संदीप भानोसे यांनी पुढचा टारगेट 2000 दिवस असे ठरविले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे