औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळवण येथे 20 फेब्रुवारी रोजी* *विविध पदांसाठी मुलाखतीचे आयोजन*
*औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळवण येथे 20 फेब्रुवारी रोजी*
*विविध पदांसाठी मुलाखतीचे आयोजन*
*नाशिक, 5 फेब्रुवारी, 2024 (नाशिक जनमत वृत्तसेवा):*
शासकीय औद्यगिक प्रशिक्षण संस्था, कळवण येथे मंगळवार 20 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता टाटा मोटर्स लि. पिंपरी, पुणे या कंपनीद्वारे विविध पदांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन केले आहे. या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये जुलै/ ऑगस्ट 2024 मध्ये परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यात आली असून जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळवण सतिष भामरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये फिटर 80 पदे, मॅके.मोटार व्हेईकल 80 पदे, पेन्टर (General) 40 पदे, शीट मेटर वर्कर 40 पदे, मेकॅनिक (डिझेल) 80 पदे, इलेक्ट्रिशिअन (फक्त मुलींसाठी) 20 पदे, वेल्डर (Gas and Eletric) 30 पदे, मेकॅनिक मशिन टुल मेंन्टनस 40 पदे, टुल ॲण्ड डाय मेकर (Jigs and Fixture) 30 जागा, मॅकेनिक ऑटो इलेक्ट्रीकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स 50 पदे, मशिनिष्ठ 20 पदे, मशिनिष्ठ (Grinder) 20 पदे, टर्नर 30 पदे, फॉन्ड्री मॅन 40 पदे व कोपा 15 पदे याप्रमाणे मुलाखतीद्वारे पदे भरती करण्यात येणार आहेत.
यासाठी उमेदवार हा इयत्ता 10 वी किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. जे प्रशिक्षणार्थी जुलै /ऑगस्ट -2024 च्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेस प्रविष्ठ होणार आहेत तेच प्रशिक्षणार्थी या मुलाखतीस पात्र असणार आहेत. सदर कंपनीत प्रशिक्षणार्थांची निवड झाल्यास त्यांना दुसऱ्या कंपनीत करार करता येणार नाही. असेही प्राचार्य सतिष भामरे यांनी कळविले आ