ब्रेकिंग
चोरीच्या दोन मोटरसायकल विकणाऱ्यांना अटक.
चोरीच्या दोन दुचाकी विकणाऱ्यांना अटक
नाशिक जनमत । नाशिक शहरातून मोटरसायकल चोरून ग्रामीण भागात मोटरसायकली दुचाकी विक्री करण्यास आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. नाशिक शहरात मोटरसायकल चोरीचे प्रकार घडत आहे गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने वडनेर दुमाला येथे ही कारवाई केली. दीपक अर्जुन पैठणे रा. लहवित, धनंजय विजय पाटील रा. धुळे असे संशयितांचे नाव आहे..
- पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पथकाने गुलाब सोनार यांना माहिती मिळाली. दोघे वडनेर दुमाला येथे दोघे जण दुचाकी विक्री करण्यासाठी येणारे असल्याचे समजले. पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. दोन दुचाकी हस्तगत केल्या. उपनिरीक्षक पोपट कारवाळ, राजेंद्र घुमरे, विवेकानंद पाठक, चंद्रकात गवळी, संदीप रामराजे, अनिल लोंढे, सुनील आहिरे, विजय वरंदळ यांच्या पथकाने ही कारवाई केली. दोघांकडून दोन दुचाकी जप्त केल्या. नाशिक शहरातील अनेक भागातून पार्किंग मधून दिवाळी व इतर वेळी मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहन तसेच सायकल देखील चोरीला जात आहे. पोलिसांनी ग्रस्त वाढून नाकाबंदी करण्याची गरज निर्माण झालेली आहे.