कृषीवार्ता

प्रधानमंत्री पिक विमा योजना;* *सोयाबिन व कापसाला 50 हजारांचे पीकविमा संरक्षण* *: विवेक सोनवणे*

 

*प्रधानमंत्री पिक विमा योजना;*
*सोयाबिन व कापसाला 50 हजारांचे पीकविमा संरक्षण*
*: विवेक सोनवणे*
*नाशिक, दिनांक 18 जुलै 2023 (नाशिक जनमत वृत्तसेवा) :*
खरीप हंगामात पिकांच्या पेरणी पासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत हवामानातील प्रतिकुल परिस्थिती तसेच पावसातील खंड यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा योजना 2023 मध्ये लागू केली आहे. त्याअंतर्गत सोयाबिन व कापूस या पिकांना 50 हजार रुपयांचे पिकविमा संरक्षण मिळणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी

अधिकारी विवेक सोनवणे यांनी कळविले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलवर लॉगीन करून किंवा नजीकच्या CSC/VLE केंद्रात निव्वळ एक रूपया भरून शेतकऱ्यांना नोंदणी करता येते. तसेच जिल्ह्यात ओरिएण्टल इंन्शुरन्स या कंपनीची प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत नियुक्ती केली आहे. भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तुर, मका ही तृणधान्य व कडधान्य तसेच भुईमूग, कारळा, सोयाबिन ही गळीत धान्य पीके आणि कापूस खरीप कांदा ही नगदी पिके अधिसूचित केलेल्या क्षेत्रात लागू राहतील. पिकांच्या पेरणी पासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड, रोग इत्यादी बाबींमुळे आणि हंगामाच्या शेवटी उत्पन्नात येणारी घट तसेच खरप हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान किंवा हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लागवड न झाल्यामुळे होणारे नुकसानीचा पिकविम्यात समावेश आहे. त्याचप्रमाणे पिकाच्या काढणीनंतर नुकसान झाल्यास देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनी बांधील असणार आहे.

पात्र लाभार्थी कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना ऐच्छिक असली तरी या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही श्री. सोनवणे यांनी केले आहे.

*अशी आहे पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम (रूपये प्रति. हेक्टर)*
मका – रूपये 35 हजार 598, कापूस – रुपये 50 हजार, सोयबिन – रूपये 50 हजार, बाजरी रूपये 27 हजार 500, तूर – रूपये 36 हजार 800, मुग – रूपये 22 हजार 500
000000000000

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे