ह भ प रामनाथ स्वामी आनतात विलीन.
- हभप.रामनाथ स्वामी अनंतात विलीन
अरुण हिंगमीरे
जातेगांव, नांदगाव
जातेगांव (प्रतिनिधी)– हभप महंत रामनाथ स्वामी
(देवबाबा) यांचे शुक्रवारी पहाटे पावणेदोन च्या सुमारास दि.२१ रोजी वृद्धापकाळाने आजारी असल्याने छत्रपती संभाजी नगर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरु असतांना निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण घाटमाथ्यावर तसेच मराठवाडा, खान्देशसह परिसरात शोककळा पसरली.
त्यांचे पार्थिव ढेकू गावात आणल्यानंतर सजवलेल्या गाडीतून अंत्ययात्रा काढण्यात आली होती यावेळी तीन हजार पेक्षा अधिक भक्त परिवार व जनसमुदाय अंत्ययात्रेत सहभागी झाले होते त्यानंतर साधू महंत व भक्त परिवाराच्या उपस्थितीत त्यांना कपिलनाथ आश्रम येथे विधिवत समाधीस्थ करण्यात आले.
रामनाथ स्वामी यांनी नाथ संप्रदायाबरोबरच वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला, ते स्वामींना बालपणापासून श्री दत्त सांप्रदायाचा लळा लागल्याने त्यांनी विवाह न करता ढेकू या गावापासून उत्तरेस असलेल्या सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगराच्या शिखरावर गुहेत असलेल्या देवी सप्तशृंगी जवळ प्रदिर्घ तपश्चर्या केली होती. या ठिकाणी नाथ सांप्रदायातील गुरू मच्छिंद्रनाथ यांच्यासह इतरांनी तपश्चर्या केली. त्या नंतर ते बालब्रम्हचारी असल्याने तेथेच जंगलात एका कुटीत राहून देवाची सेवा करत असत, हळूहळू याची पंचक्रोशीत चर्चा झाल्याने खांदेश आणि मराठवाड्यातील भाविक देवाच्या दर्शनासाठी येनार्यांची संख्या वाढू लागली, भाविकांच्या सहकार्यातून धर्मनाथ बीज, श्री दत्त जयंती निमित्त मोटमोठे हरिनाम सप्ताह होवू लागल्याने ग्रामस्थ आणि भक्त परिवाराच्या सहकार्याने तेथे श्री दत्तात्रेयाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, भक्त निवास तसेच सभागृहाचे काम करण्यात आले. स्वामींच्या शब्दास सामाजिक क्षेत्रात विषेश महत्त्व होते,
त्यांच्या निधनाने आध्यात्म क्षेत्रातील एक दुवा निखळला आहे. मराठवाडा, खान्देशसह परिसरात त्यांचा मोठा शिष्यवर्ग आहे. हभप. रामदास स्वामींनी नाथसंप्रदायाचा ग्रामीण भागात प्रसार केला.नाथसंप्रदायाच्या विचारांचा वारसा जोपासून एक धर्मनिष्ठ व संस्कारशील समाज घडविण्यासाठी त्यांनी आजीवन कार्य केले.
स्वामींच्या अंत्यविधीच्या वेळी श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथील नाथ संप्रदायचे महंत, साधू संत, परिसरातील, कीर्तनकार, भजनी मंडळी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रसंगी नांदगावचे माजी आमदार अनिलदादा आहेर, वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, तुकाराम बाबा जेऊरकर, पंढरीनाथ महाराज पगार, यांनी श्रद्धांजली अर्पण केली.