अग्निशामक दलास सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचे काळेफीत लावून आंदोलन.
अग्निशमन विभागाच्या ७० कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती लावून मनपा प्रशासनाचा निषेध
सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत नसल्यामुळे स्वीकारला आंदोलनाचा मार्ग | नाशिकजनमत
नाशिक महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा व सप्टेंबरच्या वेतनात फरकासह रक्कम अदा करण्याचा आदेश तत्कालीन मनपा आयुक्त रमेश पवार यांनी दिल्यानंतरही मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याच्या निषेधार्थ अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाज केले.
मनपाच्या परसेवेतील अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे तीन हप्ते मिळालेले आहेत. मात्र मनपाच्या कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता देण्यासाठी सॉफ्टवेअरमधील त्रुटींचे कारण पुढे करत विलंब केला जात असल्याचा आरोप नाशिक महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच
जनरल सेक्रेटरी जगदीश देशमुख, सेक्रेटरी प्रमोद लहामगे यांनी केला. ऐन दिवाळीत सुमा ७० कर्मचारी सातव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना वेतनातील फरक आणि वाढी वेतनदेखील देण्यात आलेले नाही. त्यामुले आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.