स्त्री भून हत्या थांबवण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता. महंत भक्ती चरणदास महाराज.

*स्त्रीभ्रुण हत्या थांबविण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता–महंत भक्तीचरणदास महाराज*
{ *ब्रह्माकुमारीच्या पंचवटीतील सेवाकुंज येथील केंद्रावर रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन*}
नाशिक-:(प्रतिनिधी)
आधुनिक विचारांनी पुढे जात असताना अजूनही समाजात मुला-मुली असा भेदभाव केला जातो. स्त्रीभ्रुण हत्त्या अजूनही पूर्णपणे बंद झाल्या नाहीत, त्या बंद व्हायला पाहिजे. त्यासाठी जनजागृतीची गरज आहे, असे प्रतिपादन पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तीचरणदास महाराज यांनी मांडले. ब्रह्माकुमारीच्या पंचवटीतील सेवाकुंज येथील केंद्रावर झालेल्या मंगळवारी (दि. ९) रोजी झालेल्या रक्षाबंधन सप्ताहाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्या जिल्हासंचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंतीदीदी होत्या.या कार्यक्रमास माजी नगरसेविका वत्सला खैरे, माजी नगरसेवक दामोदर मानकर, सुरेश खेताडे, भाजपा शहर संघटक सोमनाथ बोडके,व्यापारी षरिषदेचे मयूर सराफ, रघुभाई जोशी, वैशाली पोतदार,स्वाती जाधव,परिवहनच्या कार्यकारी अधिकारी विद्या बिलासपूर,जितेंद्र बिलालदार आदी उपस्थित होते.
यावेळी महंत भक्तीचरणदास महाराज पुढे म्हणाले की, रक्षाबंधन हे पवित्र बंधन आहे. रक्षाबंधनाचा धागा जीवनात परिवर्तन देतो. भावाने बहिनीच्या रक्षणाची शिकवण देतो. जीवनात चांगले कर्म करण्याची जाणीव करून देतो.
अध्यक्षीय भाषणात ब्रह्माकुमारी वासंतीदीदी यांनी कोणतीही व्यक्ती बंधन स्वीकारत नाही. पण रक्षाबंधन हे असे सूत्र आहे की, त्याचा सर्वच खुशीने स्वीकार करतात. हे सर्वात पवित्र बंधन मानले जाते. म्हणून सर्वजण त्याचा प्रेमाने स्वीकार करतात. हे आत्मिक प्रेमाचे बंधन आहे. जीवन जगण्याची कला राजयोग मेडिटेशनद्वारे शिकता येते. ध्यान एकाग्र होऊन जीवनात सर्व गोष्टी प्राप्त करू शकतो, असे सांगितले.
ब्रह्माकुमारी केंद्राच्यावतीने सुरु झालेल्या या रक्षाबंधन कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहूण्यांसह सर्व बांधवाना राख्या बांधण्यात आल्या. त्याचप्रमाणे भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवनिमित्त तिरंगा ध्वजाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.राजयोगिनी ब्रह्माकुमारी पुष्पादीदी यांनी कार्यक्रमाचे स्वागत-प्रास्तविक, सूत्रसंचालन केले. भाजपा शहर संघटक सोमनाथ बोडके यांनी पाहूण्यांचा परिचय करून दिला.बीके.ओंकार कडवे यानी सुश्राव्य स्वागत गीत गायिले. यावेळी बीके.बाळासाहेब सोनवणेसर,बीके.सतिश भदाने,बीके.मनोहर भामरे,सुनीलशेठ सोनवणे,विजय पवार,राजेंद्र बेदमुथा यांच्यासह मोठ्या संख्येने साधक होते.