प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा चे आयोजन.
*नाशिक जनमत दिनांक: 7 ऑक्टोबर, 2022*
*प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन*
*-एम.के.तेलंगी*
*नाशिक, दिनांक: 7 ऑक्टोबर, 2022(जिमाका वृत्तसेवा):*
जिल्ह्यातील आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांसाठी 10 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार एम.के.तेलंगी यांनी केले आहे.
मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर मार्फत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून हा मेळावा आद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर, नाशिक-7 येथे घेण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांना अप्रेंटिसशिप नियुक्तीची संधी उपलब्ध होणार आहे. त्याअनुषंगाने पात्र उमेदवारांनी मुळ कागदपत्र व त्यांच्या दोन छायांकित प्रतींसह उपस्थित रहावे.