वंजारी समाजरत्न पुरस्कारांचे ९ ऑगस्टला वितरण उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २१ जणांसह स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा गौरव
वंजारी समाजरत्न पुरस्कारांचे ९ ऑगस्टला वितरण
उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २१ जणांसह स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा गौरव
नाशिकः प्रतिनिधी
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक क्रांती सेना व न्यू विकलांग बहु उद्देशिय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती दिनी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता वंजारी समाजरत्न पुरस्कार २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. कॅनडा कॉर्नर येथील व्ही एन नाईक संस्थेच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षे तील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे गाढे अभ्यासक व श्री सिध्दी विनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष डॉ तुळशीराम महाराज गुट्टे राहणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुहास कांदे, आ.नरेंद्र दराडे , माजी आ. बाळासाहेब सानप, नाईक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, ज्येष्ठ उद्योजक बुधाजी पानसरे, भाजपचे ज्येष्ठ नेते गिरिश पालवे, पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, पालकमंत्री भुसे यांचे ओएसडी रामदास खेडकर, जिल्हा परिषदे माजी अध्यक्ष शीतल सांगळे, वंजारी सेवा संघाचे गुजरात प्रदेश अध्यक्ष मोहन घुगे, वंजारी सेवा संघाचे अध्यक्ष बबन खाडे, गुजरात येथील भोज राज गीते, सामाजिक कार्यकर्त्या कांचन खाडे, यमुनाताई घुगे , अरुणा दरगुडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. सदर कार्यक्रमास समाजबांधवांनी उपस्थित रहावे , असे आवाहन आयोजक दत्तु बोडके, समिती अध्यक्ष बी. के.नागरे सर, रंगनाथ दर गुडे, बाळासाहेब घुगे, प्रकाश चकोर, मारुती इलग , आदिनाथ नागर गोजे, विलास सानप, रोहीदास आव्हाड आदींनी केले आहे.
चौकट
शैक्षणीक, सहकार क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या पंढरीनाथ थोरे यांचा नागरी सत्कार करण्यात येईल. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.त्यात ज्येष्ठ उद्योजक बुधाजी पानसरे, गिरिश पालवे, माधुरी कांगणे, ज्येष्ठ पत्रकार श्याम उगले, न्यायधिश कीर्ती कातकाडे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते, कृषी अधिकारी रणजित आंधळे, मुंबई येथील जेष्ठ समाजसेवक संजय आव्हाड ,श्री मच्छिंद्र परचंडे आदींसह २१ जणांचा समावेश आहे.