ब्रेकिंग

काळा बाजारात विकला जाणारा रेशनचा तांदूळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडला सिनेस्टाईल.

काळ्या बाजारात विकला जाणारा रेशनचा

तांदूळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडला सिने स्टाईल !

 

नाशिक, ता. १८ : शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या कार्यकर्त्यांनी काळ्या बाजारात विकल जाणारा हजारो किलो तांदूळ सिनेस्टाईल पकडल्याने सिडको परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

एम १५ ई.एच. ३३२६ ही रिक्षा १० ते १२ तांदळाच्या गोण्या घेऊन जात असताना सिडको परिसरात शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या शिताफिने पकडली. यासंदर्भात श्री. बडगुजर यांनी तात्काळ जिल्हाधिकारी महोदय यांच्या कानावर सदर बाब टाकली. जिल्हा पुरवठा कार्यालयाचे अधिकारी घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तांदळाच्या गोण्यांनी भरलेली रिक्षा व रिक्षा चालकाला ताब्यात घेतले. जागीच पंचनामा केला. पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी पंचवटीत राहणारा रिक्षा चालक ची कसून चौकशी केली परंतु त्याने संबंधित रेशन दुकानदाराचे नाव मात्र काहीं  सांगितले नाही. या संदर्भात पुढील कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस करणार आहेत.

शिवसेनेचे पंकज जाधव, नाना पाटील, सुभाष गायधनी, अविनाश काकडे, दिग्विजय सोनवणे, कुणाल सोनवणे आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदर रिक्षा, तांदळाच्या गोण्या व रिक्षा चालकास पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यासंदर्भात रेशन ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

प्रतिक्रिया

शासनाच्या वतीने गोरगरिबांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले धान्य हे सर्रासपणे काळ्या बाजारात विकले जात असल्याची बाब शिवसेना कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी सदर माल पकडून दिला. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले असता त्यांनी पंचनामा केला. केवळ रिक्षा चालकावर कारवाई न करता संबंधित रेशन दुकानदारावर कारवाई होणे अपेक्षित आहे.

सुधाकर बडगुजर, शिवसेना महानगरप्रमुख

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे