डॉक्टर शहाणे बंधू कडून नागरिकांची आर्थिक जागरूकता व्हावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ρडॉ. शहाणे बंधुंकडून नागरिकांची आर्थिक जागरूकता व्हावी – मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे
नाशिक (प्रतिनिधी) – डॉ कृष्णा शहाणे आणे डॉ. राजेंद्र शहाणे यांनी अधिकाधिक विद्यार्थी उपयोगी लेखन करीत राहावे व अर्थशास्त्राच्या समृध्द वाटचालीत आपल्या प्रभावी लेखणीतून लोकांमध्ये आर्थिक जागरूकते साठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांनी व्यक्त केली.
डॉ. राजेंद्र शहाणे, डॉ. कृष्णा शहाणे यांनी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांचेसाठी “विकासाचे अर्थशास्त्र” या तृतीय वर्ष कला या वर्गासाठी लिहिलेल्या मराठी माध्यमातील पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते मलबार हिल, मुंबई येथे झालेल्या एका समारंभात संपन्न झाले, याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खा. राहुल शेवाळे, मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. नितीन लालसरे, मुंबई विद्यापीठाचे अर्थशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य डॉ.शिवाजी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. कृष्णा शहाणे यांनी पुस्तक लिखाणाची पार्श्वभूमी स्पष्ट केली.
- या प्रसंगी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.