अंबड परिसरातील दत्तनगर भागात दोन कुटुंबाच्या वाद.. दगडफेक नागरिकांमध्ये दहशत.
नाशिक जनमत अंबड परिसरातील दत्तनगर भागात रविवारी रात्री दत्तनगर परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये गुंडांनी हौदास घातला होता तसा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे यामुळे आंबड परिसर पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. दरम्यान ही घटना दोन कुटुंबाच्या वर्चस्वामुळे घडली असल्याचे अंबड पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही कुटुंबाने परस्पर एकमेकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.आंबड परिसरामध्ये गुन्हेगारी पुन्हा एकदा वर डोके काढत आहे. तरुण वर्गामध्ये गुन्हेगारी वाढत असून तरुण मुले गुन्हे करण्यास घाबरत नसल्याचे चित्र आहे. किरकोळ कारणावरून वाद झाले की काही तरुण आपल्या मित्रांना फोन करतात व त्यानंतर दहा-पंधरा जण येऊन त्या भागामध्ये दहशत निर्माण करत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. हाच प्रकार दत्तनगर परिसरात देखील दिसून आलेला आहे दहा-पंधरा जणांच्या टोलयांच्या हातात. काठी व दगडे हातात दिसत आहे. यामुळे या परिसरामध्ये घबराट पसरली होती तरुणांनी दगडफेक केली दरम्यान या घटनेविषयी या परिसरातील नागरिक दशतीखाली असून याबाबत आमच्या प्रतिनिधीला माहिती दिली नाही. पोलिसांनी रात्री व दिवसागस्त वाढवणे महत्त्वाचे आहे. पोलीस गस्त घालत असताना गुन्हेगारांना न शोधता अवैध धंद्याच्या ठिकाणी जात येत असल्याचे नागरिकांची चर्चा आहे अंबड पोलिसांनी अंबड परिसरातील गुन्हेगारी कमी करावी. पोलीस आयुक्त जयंत ननावरे यांनी लक्ष घालावे. वाढती गुन्हेगारी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अंबड परिसरामध्ये व सिडको परिसरामध्ये नागरिक व महिला सुरक्षित नसल्याचे दिसत आहे महिलांच्या सोनसाखळी तोडण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. 14 15 वर्षाचे मिशी न फुटलेले मुलं सिडको भागामध्ये भाईगिरी करत आहे. हातात सिगरेट व छाती काढत व मोटरसायकलवर जाताना विचित्र हातवारे करणे लज्जा उपस्थित होईल अशाप्रकारे मोटरसायकलवर जाताना मोठ्या मोठ्याने बोलणे असे प्रकार याचा जाताना रस्त्यावर सरासपणे दिसत आहे. पोलिसांनी सिंघम बनून गुन्हेगारी कमी करावी. नाशिक शहराला सिंघम पोलीस अधिकाऱ्याची गरज निर्माण झाल्याचे नागरिक व महिला वर्गामध्ये चर्चा आहे. दरम्यान दोन कुटुंबाच्या वर्चस्वाच्या वादात ही घटना घडली असून अंबड पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूच्या बारा लोकांवर गुन्हा दाखल असल्याचे कळते.
को