ब्रेकिंग
सुवर्णकार समाजाचा रविवारी मोफत वधू मेळावा.
सुवर्णकार समाजाचा रविवारी मोफत वधु-मेळावा !
आयोजकांकडून गरजू पालकांना मिळणार प्रवास खर्च !
नाशिक, ता. २ :महाराष्ट्र ओबीसी सुवर्णकार समितीच्या वतीने रविवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी आडगाव नाक्या जवळील राजीव मंगल कार्यालय येथे सोनार समाजातील सर्व शाखीय वधू-वर मेळावा आयोजीत कराण्यात आल्याची माहिती आयोजक व समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.
संपूर्ण सोनार समाज एकत्र आला पाहिजे. सुवर्णकार समाजामध्ये एकूण १८ पगड जाती आहेत. यामध्ये रोटी-बेटी व्यवहार झाले पाहिजे. या उद्दात हेतूने हा वधू-वर मेळावा घेण्यात येत आहे. समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी सुवर्णकार समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व मेळावा प्रमुख गजू घोडके यांनी केली आहे.