नाशिक रोड येथील सचिन बिडवे यांच्या घरी गौरी गणपतीचे उत्साहात स्वागत व विसर्जन.
नाशिक जनमत सोनपावलनाने आलेल्या गौरी गणपतीची स्थापना मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली पंचपखवानाचे विविध नैवेद्यदेवीला दाखवण्यात आले .समृद्धी होऊन माहेर वाशिम आलेल्या गौरीची आरती
करत पारंपारिक गीते गाण्यात आली.नासिक रोड देवळाली गाव येथील सचिन रमेश बिडवे यांच्या निवास स्थानी सालाबाद प्रमाणे गौरी गणपती चे पूजन मोठ्या उत्साहात साजरे केले. या वेळी बिडवे कुटुंबीयांनी मनमोहक अशी आरास केली होती. बिडवे कुटुंबीय गेल्या वीस वर्षा पासून गौरी गणपती पूजन मोठ्या उत्साहात साजरा करतात. आणि या उत्साहात घरातील सर्व मंडळी सहभागी होतात. गौरी गणपती आरास, त्यांचे सर्व फराळाचे पदार्थ या साठी घरातील सर्व सदस्य परिश्रम घेतात. यासाठी त्यांच्या पत्नी रंजना बिडवे. भाऊ अमित बिडवे,भाऊजय आशा बिडवे, मुले यश बिडवे चैतन्य बिडवे अर्जुन बिडवे आनंद बिडवे. सर्व जण परिश्रम घेतात. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गौरी गणपती देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती देवी च्या भोवती विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच मोठ्या प्रमाणात निवेद्य तयार करण्यात आले होते. दरम्यान सोमवारी गौराईचे विसर्जन करण्यात आले. गौराई आल्याने घरामध्ये भक्तीमय व आनंदी वातावरण होते.