दोन अपंगाच्या एका आगळ्यावेगळ्या प्रेमविवाहाची कहाणी.
*दोन अपंगांच्या एका आगळ्या वेगळ्या प्रेम विवाहाची कहाणी*
*नाशिक : आपल्या सभोवताली दररोज अनेक प्रेमविवाह होत असतात पण सिन्नर तालुक्यात नुकताच एक एक आगळा वेगळा विवाह सोहळा उजनी गावात झाला. शिक्षणाच्या ओढीने सरपटत शाळेत जाणाऱ्या दोंघाची मैत्री होते.मग प्रेम आणि त्या कथेचा शेवट विवाहात झाला. साधेपणाने झालेल्या या विवाहाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.*
*या कथेचे प्रमूख पात्र आहेत जालिंदर आणि सारिका.* *जन्मत च अपंग असले तरी दोघांना शिक्षणाची ओढ होती. काहीही झाले तरी आपण शिक्षण पूर्ण करायचे ही जिद्द त्यांनीं ठेवली. आणि मग सुरू झाला शिक्षणाचा रोजचा प्रवास. दोन्ही घरची परिस्थिती हलाखीची त्यामुळें दररोज कुणी शाळेत सोडणे अशक्य किंवा वाहन व्यवस्था तर अशक्यप्राय होती. पण आपण म्हणतो ना जिथे इच्छा असेल तिथे हमखास मार्ग दिसतोच तसेच इथे घडले आणि दोघांनी दररोज चप्पल हातावर घेवून सरपटत सरपटत का होईना शाळेत जाण्याचा पण केला. आणि याच मुळे दोन्हींचे शिक्षण पूर्ण झाले. अपंग शाळेत शिकत असतांना ओळख-मैञी आणि प्रेम आणि नंतर त्याचा विवाह असा प्रवास झाला आहे. दोघेही जमिनीवर सरकत चालतात.* *३० जुन २०२२ रोजी या दोघांनी अगोदर कोर्ट रजिस्टर मँरेज करुन घेतले आणि थाटामाटात लग्न करणार तशी परिस्थिती पण त्या कुटूंबाची नसल्याने कुठल्याही खर्च न करता गावात अगदी साधेपणाने हा विवाह सोहळा संपन्न झाला.*
*या विवाह प्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तु बोडके , जिल्हा चिटणीस समाधान बागल, नाशिक शहर प्रमुख शाम गोसावी, सिन्नर तालुका प्रहार अपंग क्रांती आदोंलनाचे अरुण पाचोरकर आणि ईतर अपंग मंडळी, नातेवाईक व मिञपरिवार उपस्थित होते*