ह.भ.प. जगन्नाथ बाबा कासार अनंतात विलीन
अरुण हिंगमीरे
जातेगांव, नांदगाव
संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे पहिले शिष्य ह.भ.प. परमपूज्य जगन्नाथ बाबा कासार राहणार जातेगाव यांना रविवार दि. १८ जुलै रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी दिंडोरी येथील क्षीरसागर हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना सायंकाळी पाच वाजता देहावसन झाले.
संत जनार्दन स्वामी यांचे सन १९६० च्या दशकात जातेगांव आगमन झाल्या पासून नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नंतर दुसर्या क्रमांकाचे प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या जिर्णोद्धार करण्या पासून जगन्नाथ बाबा त्यांच्या सानिध्यात होते, संत जनार्दन स्वामी यांनी त्यावेळी स्थापन केलेल्या श्री पिनाकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे जगन्नाथ बाबा विश्वस्त होते.
परमपूज्य जनार्दन स्वामी यांच्या प्रत्येक कार्यक्रमात जगन्नाथ बाबा यांनी स्वताला वाहून घेतले होते, ते प्रत्येक ठिकाणी हजर असत, त्यावेळी जगन्नाथ बाबा यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु परमपूज्य जनार्दन स्वामी यांच्या प्रपंच करून परमार्थ करण्याच्या आदेशामुळे लग्न केले होते.
परंतू प्रपंचाच्या जस्त विळख्यात न पडता स्वांमीच्या सेवेत जवळपास ३५ ते ४० राहिले, त्यांना खांदेश तसेच मध्य महाराष्ट्रात मानणारा मोठा भक्त परिवार होता.
१ जानेवारी १९३८ चा जन्म असलेले जगन्नाथ बाबा त्यांच्या तरुण वयात (मल्ल) पहेलवान होते, ते येथील विविध कार्यकारी सोसायटीचे बरेच वर्ष अध्यक्ष होते, स्थानिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा दबदबा होता.
बाबांच्या पार्थिवाचे सोमवारी सकाळी आठ वाजेपासून गावातील प्रमुख मार्गावरून भजनाच्या दुमदूमत्या स्वरात भव्य मिरवणूक काढण्यात आली, यावेळी त्यांचा भक्त परिवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
त्यानंतर त्यांच्या शेतातील रहाते घराच्या बाजूस संत जनार्धन स्वामी यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर श्री शांतिगीरीजी महाराज यांच्या वतीने परमपूज्य रामानंद स्वामी, सेवागिरीजी महाराज व पिनाकेश्वर देवस्थान येथील माळी बाबा यांनी मंत्राच्या जयघोषात समाधिस्थ केले.
या प्रसंगी जनार्दन स्वामी महाराज यांच्या ट्रष्टचे प्रशासकीय अधिकारी काकासाहेब गोरे त्याचप्रमाणे जय बाबाजी भक्त परिवारातील भक्तगण, बाबांचे आप्तेष्ट, परिसरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. जगन्नाथ बाबा यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, जावाई, नातवंडे असा परिवार
आहे.
फोटो
१) जगन्नाथ बाबा कासार
२), ३), व ४) संत जनार्दन स्वामी यांच्या समावेत फोटो