विजयनगर येथे दत्त जयंती धार्मिक वातावरणात साजरी.
नाशिक जनमत. विजयनगर नवीन नाशिक येथे विजयनगर कला क्रीडा मित्र मंडळाच्या वतीने दत्त जयंती निमित्ताने श्री गुरुदेव दत्तांची महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आरतीचे मानकरी अंबड पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोदजी वाघ व मनपा उपायुक्त तथा नवीन नाशिक विभागीय अधिकारी श्री डॉ.मयुर पाटील साहेब, सामाजिक कार्यकर्ते गोविंद घुगे यांच्या हस्ते दुपारी १२:०० वा. महाआरती करण्यात आली व त्या नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.*
*कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक अँड अजय आव्हाड, अध्यक्ष गोपाल जायभावे सरचिटणीस अर्जुन वेताळ, शांताराम सांगळे, अरुण राऊत, सचिन दंडगव्हाळ, अविनाश जाधव, जगदिश निकुंभ, रविंद्र चौधरी, परिमल महाले, सचिन आंधळे, दिपक महाजन, लाला आहिरे, पन्नालाल जैसवाल, नाना निकुंभ, अविनाश मराठे, गणेश सानप, प्रितेश काजळे, संदेश वाघ, रामेश्वर शिंदे, रामदास निकम, संदिप मालोकर, सुभाष शेळके, मंडळाच्या ह्या पदाधिकारींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. त्याप्रसंगी परिसरातील नागरिक व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने आरतीसाठी उपस्थित राहुन. महाप्रसादाचा लाभ घेतला*.