नाशिक शहरातील 90 जामदारांना उपनिरीक्षक पदी बढती. ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये जामदारांना बढती का नाही का..
नाशिक जनमत . एकीकडे शहरामध्ये पोलीस दलातील विविध पोलीस ठण्यात कार्यरत सहाय्यक उपनिरीक्षकांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती देण्यात येत आहे तर ग्रामीण पोलीस दलामध्ये अनेक वर्ष जामदार पदी नोकरी करूनही उपनिरीक्षक पदी बढती का दिली जात नाही असा प्रश्न ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना पडला आहे पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार नाशिक शहरातील पोलीस उपनिरीक्षक पदी मिळालेले कर्मचारी वर्गामध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तर ग्रामीण पोलीस दलातील जामदारांना भरती न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे नासिक ग्रामीण वर हा अन्याय का बरं .ग्रामीण शहरी असा मतभेद का असे अनेक ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी नाशिक जन्मत जवळ बोलून दाखवले. अनेकांनी आपली सेवचा कार्यकाळ संपत आला असून ग्रामीण बढती मिळालेली नाही असा ग्रामीण पोलीस दलामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.