उमराळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उद्या होणार शिकाऊ उमेदवारांची भरती..
- दिनांक: 23 जून, 2022
*उमराळे आद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज होणार शिकाऊ उमेदवारांची भरती*
*नाशिक: दिनांक 23 जून, 2022 (जिमाका वृत्तसेवा):*
दिंडोरी तालुक्यातील उमराळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज शुक्रवार 24 जून 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दिंडोरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सतिष भामरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, या शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्यास मुळ कागदपत्रांच्या छायांकित प्रती, शाळा सोडल्याचा दाखला, 10 वी गुणपत्रिका, आय.टी.आय. उत्तीर्ण गुणपत्रिका, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचे फोटो, कोविड-19 लस घेतल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसह दिलेल्या विहित कालावधीत उपस्थित रहावे, असे आवाहन दिंडोरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. भामरे यांनी केले आहे.
या मेळाव्यामध्ये वेल्डर, कार पेंन्टर आणि आय.टी.आय. डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसाठी मशिन ऑपरेटर या ट्रेडसाठी भरती करण्यात येणार आहे.